… आता स्नेहश्री मल्टीस्टेट समोर गुंतवणूकदारांच्या रांगा! शाखेला कुलूप?
जालना- ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये फसवणूक झाल्यानंतर अशा शाखांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक आणि ठेवीदारांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. त्यामुळे आता अशा क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये ठेवलेल्या गुंतवणुकी आणि ठेवी काढून घेण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जालना जिल्ह्यामध्ये असलेल्या स्नेहश्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड पुणे, यांच्या जालना जिल्ह्यामध्ये सात तर इतर ठिकाणी तीन शाखा आहेत. जिल्ह्यातील शाखांमध्ये गुंतवणूकदारांनी गुंतवणुक काढून घेण्यासाठी गर्दी केली होती परंतु त्यांच्या गुंतवणुकीची रक्कम परत देऊ न शकल्याने अनेक शाखांमध्ये गोंधळ झाला आणि त्यातून या शाखा बंद कराव्या लागल्या .काल दिनांक 26 रोजी अंबड येथील शाखा देखील बंद करावी लागली .ही शाखा बंद झाल्याची वार्ता सर्वत्र पसरल्यानंतर आज सकाळी जालना शहरातील शाखेसमोर देखील गुंतवणूकदारांनी मोठी गर्दी केली होती परंतु ही शाखा देखील बंद असल्याने वाद होऊ नयेत म्हणून कदिम जालना पोलिसांनी शाखेच्या ठिकाणी येऊन गुंतवणूकदारांची समजूत काढली.
दरम्यान या शाखेमध्ये वकील मंडळींची मोठी गुंतवणूक असल्यामुळे ही शाखा हस्तांतर करण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु गेल्या आठ दिवसांपासून स्नेह श्री मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी साठी पिग्मी कलेक्शन करणाऱ्या एजंटानीच कलेक्शन बंद केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे. अनेक गुंतवणूकदार गेल्या आठ दिवसांपासून जालना येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यासाठी चकरा मारत आहेत परंतु कायद्याच्या तरतुदीनुसार संबंधित गुन्हा हा त्या- त्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतच दाखल व्हायला हवा म्हणून आर्थिक गुन्हे शाखेने अशा तक्रारदारांना संबंधित पोलीस ठाण्याकडे पाठवले आहे. आणि अद्याप पर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे या क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या व्यवस्थापकांनी संचालक मंडळ बदलणार आहे आणि नवीन संचालक मंडळ स्थापन झाल्यानंतर सर्वांच्या ठेवी आपण परत देऊ असे आश्वासन दिले आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172