तीन मतदारसंघावर ठाकरे सेनेचा दावा ; महिलेलाही उमेदवारी देण्याची तयारी-संजना घाडी, प्रवक्त्या शिवसेना
जालना- जिल्ह्यातील जालना ,भोकरदन आणि बदनापूर या तीन विधानसभा मतदारसंघावर उद्धव ठाकरे सेनेच्या गटाने दावा केला आहे. “स्त्री शक्ती संवाद” दौऱ्यानिमित्त शिवसेनेच्या उपनेत्यात तथा प्रवक्त्या संजना घाडी आज जालना जिल्ह्यात आल्या होत्या. महिलांचे संघटन, संघटनात्मक बांधणी आणि मजबुतीकरण याचा त्यांनी आढावा घेतला. हा आढावा घेत असतानाच महिला जर सक्षम मिळाली तर तिला आपण उमेदवारी देऊ, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यांच्यासोबत शिवसेनेच्या उपनेते अस्मिता गायकवाड, मुंबईच्या माजी नगरसेविका सोनम जामसुतकर, हिंगोलीच्या संपर्क संघटिका प्रियंका घाणेकर आदींची उपस्थिती होती.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172