जालन्याच्या वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी; पहिल्या भट्टीत तयार होणार 100 डॉक्टर!
जालना- जालना येथील बहुचर्चित वैद्यकीय महाविद्यालयाला अखेर दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी परवानगी मिळाली आहे . पहिल्या भट्टीमध्ये 100 डॉक्टरांना तयार करण्यात येणार आहे. यासंदर्भात शासनाच्या उपसचिव डॉ. पुनम मीना यांनी अध्यादेश काढला आहे.
दिनांक 24 जून 2024 रोजी मेडिकल कौन्सिलच्या चार निरीक्षकांनी जालन्यात येऊन वैद्यकीय महाविद्यालयासाठी असणाऱ्या सोयी सुविधांची पाहणी केली होती. त्यावेळी महाविद्यालयाला स्वतःची इमारत नाही, शिकवण्यासाठी प्राध्यापक नाहीत, आणि शासकीय रुग्णालयासोबत सामंजस्य करार केलेला नाही. या तीन बाबींमुळे ही परवानगी रखडली होती. त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेकडे आमदार कैलास गोरंट्याल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी वारंवार पाठपुरावा करून या सर्व गोष्टींची पूर्तता केली आणि शेवटी हा आदेश निघाला.
अशी होणार भरती- एकूण शंभर जागांसाठी प्रवेश दिले जाणार आहेत त्यापैकी 15 जागा या केंद्र शासनाच्या नियमानुसार म्हणजेच गुणवत्तेवर भरल्या जातील, उर्वरित 85 जागा या राज्य शासनाच्या वतीने भरल्या जातात. त्यामध्ये नियमानुसार आरक्षण ही ठेवलेले असते, जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या मागासलेले(ews) आहेत आणि खुल्या प्रवर्गाशिवाय इतर प्रवर्गामध्ये येतात त्यांना इथे वस्तीगृहापासून सर्व सोयींमध्ये मोफत प्रवेश आहे, परंतु जे विद्यार्थी खुल्या प्रवर्गात येतात त्यांना सुमारे एक ते सव्वा लाख रुपये दरवर्षी फी भरावी लागणार आहे.
एक आक्टोबर पासून राऊंड- ज्या विद्यार्थ्यांना जालन्यामध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांना लगेचच सुवर्णसंधी आहे .एक ऑक्टोबर पासून वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सुरू होत आहेत आणि पहिला राऊंड हा एक आक्टोबरलाच आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. लगेचच 15 ऑक्टोबर पासून वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तासिका देखील सुरू होणार आहेत. अवघ्या पंधरा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि जालन्याच्या लौकिकामध्ये आणखी एक मानाचा तुरा रोवल्या जाणार आहे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172