वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेयवादावरून वातावरण तापले!कोण कोणास काय म्हणाले पहा!
जालना- महाराष्ट्र शासनाने काल दिनांक ३० सप्टेंबर रोजी जालना येथे शंभर विद्यार्थ्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे . या परवानगीच्या पार्श्वभूमीवर आज जालना येथे काँग्रेसचे आ. कैलास गोरंट्याल, आणि माजी मंत्री अर्जुनराव खोतकर या दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन हे कॉलेज आपल्यामुळे झाले आहे असा दावा केला आहे. याचे श्रेय देखील आपलेच असल्याचे म्हटले आहे .या संदर्भात दुपारी एक वाजता कैलास गोरंट्याल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आत्तापर्यंत चा पूर्ण इतिहास त्यांनी सांगितला. इतर राजकारणी याचे श्रेय घेत आहेत असे म्हटल्यानंतर त्यांनी उत्तरा दाखल दिया बुझने से पहिले फडफड करत आहे असे म्हणत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांच्यावर टीका केली. तर आमच्याच बातम्या चोरून पेपरला द्यायच्या आणि छापून आणायच्या असा धंदा आम्ही करत नाहीत आणि ती सवय पण नाही. परंतु काही लोक आयत्या बिळावरचे नागोबा झाले आहेत असेही त्यांनी टीकेच्या उत्तरा दाखल सांगितले.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172