रणरागिणी:.. नवरा अपेक्षित होता इंजिनियर, मिळाला कलेक्टर ,आणि हो “ते” खोडकरच आहेत -इंजि.सौ.अश्विनी श्रीकृष्ण पांचाळ

जालना-” ते असं असतं ना! की पाहायला मुलगा येतो, मुलगी चहा घेऊन येते अगदी तशाच पद्धतीने आमचं लग्न झालं. अपेक्षित नवरा होता इंजिनियर आणि मिळाला कलेक्टर. संख्याबळापेक्षा गुणवत्तेवर ते भर देतात. आणि बाहेर जरी ते कलेक्टर असले तर घरी नावाप्रमाणेच खोडकर आहेत. लहानपणी नवकण्या पूजनासाठी आमची” डिमांड” वाढलेली असायची. आता त्या डिमांड चा विषय नाही पण संकल्प करू शकते कारण संकल्प हे मनाला आनंद देऊन जातात. त्याचाच एक भाग म्हणून मी दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळेत असलेल्या मुलींना घरी बोलावून नवकण्या पूजन करते. मी कलेक्टर ची बायको आहे असं कधीही समजत नाही आणि म्हणूनच आवर्जून जिथे बोलावले तिथे जात असते. मी इंजिनियर तर आहेच परंतु त्यासोबत आता एमबीए देखील करत आहे मध्यंतरीच्या काळात कौटुंबिक जबाबदारीमुळे शिक्षण थांबलं होतं परंतु आता पुन्हा नव्या जोमाने शिक्षण पूर्ण करून नोकरी करणार आहे नवतरुणींना माझा हात सल्ला आहे की कौटुंबिक जबाबदाऱ्या मुलांच्या जबाबदाऱ्या या तर महत्त्वाच्या आहेत त्यासाठी करियर थांबवू नका काही काळ थांबलेलं करियर अडचणी संपल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सुरू करा. माझ्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी मी रांगोळी काढते आणि गणपती तयार करते. अशीच एक रांगोळी मी प्रत्येकी तीन तास अशा एकूण बारा तासांची तिरुपती बालाजीची काढली होती आणि माझे सासरे या रांगोळी जवळ म्हणजेच बालाजीच्या पायथ्याशी झोपत होते.” हे सर्व सांगितलं आहे इंजिनीयर सौ अश्विनी श्रीकृष्ण पांचाळ यांनी ज्यांचे पती सध्या जालन्याचे जिल्हाधिकारी आहेत. यासोबतच त्यांनी Edtv News च्या माध्यमातून इतरही काही मोलाचे सल्ले दिले आहेत, गुपितं सांगितली आहेत. काय आहेत गुपित हे पाहण्यासाठी व्हिडिओ बघा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172