रणरागिनी; राज्यसेवेच्या परीक्षेत टिपण जुळलं ,आणि स्वतःला सिद्ध करून लग्न केलं

जालना- “खरंतर लवकर लग्न करायचं नव्हतं परंतु घरची परिस्थिती आणि आईने लग्नासाठी लावलेला सपाटा, यामुळे लवकर लग्न करावं लागलं. राज्यसेवेच्या परीक्षेची तयारी करत असतानाच एका सहकारी मित्रांसोबत मैत्री झाली आणि या मैत्रीला सर्वांच्या संमतीने , लग्नासाठी असणाऱ्या सर्व परीक्षा पूर्ण करून , स्वतःच्या पायावर उभे राहून, स्वतःला सिद्ध करून मगच लग्न केलं. गटविकास अधिकाऱ्याची नोकरी हातात असताना ती सोडून कुटुंबाला वेळ देता यावा, कारण महिला कितीही मोठी झाली तरी तिला घरची जबाबदारी सुटत नाही हे लक्षात ठेवून बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून राज्यसेवेत रुजू झाले. आता उपमुख्य कार्यकारी अधिकारी( महिला व बालकल्याण) जिल्हा परिषद जालना येथे कार्यरत आहे. हे काम करत असताना गेल्या दोन वर्षांपासून अंगणवाडी सेविका, मदतनीस, लाभार्थी स्तनदा माता, यांना वेगवेगळ्या प्रकारचे लाभ देत असताना मी केलेल्या कामाचे समाधान मिळते आणि रोजच्या रोज मुलांसोबत असलेल्या संपर्कांमुळे बरंच काही शिकायला मिळतं. यातून महत्त्वाचा विषय म्हणजे मुलांना कधीही एकट पडू देऊ नका, त्यांना माणसांमध्ये ठेवा आणि असे झाले तर ते एक चांगला माणूस म्हणून घडतील.हेच Edtv news च्या माध्यमातून सांगायचं आहे.”सौ.कोमल कोरे-चाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी( महिला व बालकल्याण) जिल्हा परिषद जालना.
“रणरागिणी 2024”, कोण म्हणतं नवरा माझा खोडकर? लाडक्या बहिणींची संख्या वाढल्यामुळे कोणाच्या बायकोला झालाआनंद? कोणाचा झाला प्रेम विवाह? शिक्षण घेतानाच कोणाचे जुळले हृदयाचे तार? 17 वर्षाची कोणती मुलगी बनली कर्णबधिर आई-वडिलांचा “दिवा”? कर्तुत्ववान आणि प्रेरणादायी महिलांची मालिका?पहा फक्त Edtv jalna news वर.*
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172