कच्च्या गोट्या खेळणारा मी गल्लीतला नेता नाही, चांगल्या -चांगल्यांचे मुडदे पाडले म्या! माजी मंत्री दानवे कोणाला म्हणाले?
जालना- जालना जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघावर आतापर्यंतच्या निवडणुकीमध्ये भाजपाने पहिल्यांदाच दावा ठोकला आहे. आज भाजपा सदस्यता अभियान व कार्यकर्ता महामेळाव्यामध्ये महाराष्ट्राचे निवडणूक प्रमुख तथा माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील याची पुष्टी केली आहे. त्यासोबत निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबद्दल मित्र पक्षाच्या नेत्यांनी आपल्यामुळेच दानवेंचा पराभव झाला असे मोठेपणाने सांगितले आहे परंतु माझ्यामुळे विजय झाला असे सांगणारे अनेक पहिले , माझ्यामुळे पराभव झाला असा सांगणारा महाभाग मी पहिल्यांदाच पहात आहे अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. शासकीय वैद्य वैद्यकीय महाविद्यालयाच्या श्रेया बद्दल दोन्ही नेते डफळे वाजवीत आहेत ,परंतु हे वैद्यकीय महाविद्यालय केंद्र सरकार मुळे झाले आहे आणि त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नऊ तारखेला ऑनलाईन करणार असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान अनेक वेळा “टायगर अभी जिंदा है “हे वाक्य ऐकायला मिळते त्याचा समाचार घेत, पडल्यानंतर शेवटच्या सहा महिन्यांमध्ये पोस्टरबाजी करून मी जिवंत आहे असे सांगावे लागते, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. दरम्यान कोणी सोबत असो अथवा नसो आम्ही ही निवडणूक जिंकणारच असा दावा देखील माजी मंत्री दानवे यांनी केला आहे. त्यासोबत मी कच्च्या गोट्या खेळणारा माणूस नाही, चांगल्या चांगल्यांचे मुडदे पाडले आहेत. मी राज्य पातळीवरचा नेता आहे गल्लीतला नाही. असे सांगून मित्रपक्ष व विरोधी पक्षाला सज्जड दमच दिला आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक येथे वाटप केलेल्या साड्या गावकऱ्यांनी जाळून टाकल्या याबद्दल देखील श्री. दानवे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. सविस्तर बातमी पाहण्यासाठी वरील व्हिडिओ पहा.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172