Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हा

रणरागिनी; आधुनिकीकरणात भक्ती, श्रद्धा, आस्था, विसरु नये ;माझे प्रेरणास्थान कीर्तनकार ऍड.अपर्णा रामतीर्थकर-ऍड.सौ. दुर्गा संजय उदगीरकर

जालना -नवरात्रीच्या स्वरूपात अमुलाग्र बदल झाले आहेत. आधुनिकीकरण होत आहे .आर्थिक बाजू सक्षम असल्यामुळे ते होणे अपेक्षितही आहे. परंतु यामध्ये श्रद्धा, भक्ती, आस्था ,कमी होऊ नये. उलट उत्साहात नवरात्रोत्सव साजरा करावा.सध्याच्या परिस्थितीत कुटुंब व्यवस्था विस्कळीत होत चालली आहे. कारण दोघेही आता कमवायला लागले आहेत. त्यामुळे कुठे ना कुठेतरी मी का माघार घेऊ? हा प्रश्न देखील समोर यायला लागला आहे. परंतु कुटुंबाचा गाडा चालवतातांना कोणालातरी थोडे का होईना मागे सरकावेच लागेल! आणि त्यामुळेच कुटुंब व्यवस्थेची घडी विस्कटू नये आणि न्याय देता यावा म्हणून मी कीर्तनकार एड. अपर्णा रामतीर्थकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन वकिली व्यवसायात आले. परंतु इथे सर्वांना न्याय देता येईलच असे नाही. म्हणून न्यायदानाच्या खुर्चीवर बसून न्याय निवाडा करायचा आहे. त्यासाठी न्यायाधीश पदाची आवश्यक असलेली परीक्षा दिली होती  परंतु एकदा अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा ही परीक्षा देऊन यश संपादन करून समाजासाठी न्यायदानाचे काम करायचे आहे. लहानपणी घरी धार्मिक वातावरण असल्यामुळे आम्हाला जत्रेत जायचे कामच पडायचे नाही आमच्या घरीच जत्रा भरायची-ऍड. सौ दुर्गा संजय उदगीरकर.

nrg

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button