रणरागिणी; “भाऊजी” म्हणायची वेळ आली होती, पण “अहो” म्हणण्याची वेळ आणली;आरे ला कारे केलंच पाहिजे-सौ.पुदिना

जालना- समाजातील परिस्थिती बघता वडील, नवरा, भाऊ, आपल्याला सोबत कुठे कुठे राहणार कुठे कुठे आपलं रक्षण करणार? याचा विचार केला असता आता आरेला कारे करण्याची वेळ आली आहे आणि असे झाले तरच महिलांना सक्षमपणे आणि निर्भीडपणे समाजात जगता येईल आणि पुढे जाता येईल. आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरोधात आक्रोश करता आलाच पाहिजे! त्यासाठी हे आवश्यक आहे. वडिलांनी शिस्त लावली आणि लढायला शिकवलं त्यातच पहिलीच लढाई वडिलांसोबत झाली ती म्हणजे नवरा मिळवण्यासाठी. दीपक नाईक यांचं लग्न माझ्याच मैत्रिणी सोबत होणार होतं ,परंतु दीपकला ती मुलगी नको होती आणि मला कोणी ना कोणीतरी नवरा करावाच लागणार होता, त्यामुळे वडिलांसोबत भांडून हा अंबडजवळचा नवरा केला .त्यामुळे ज्याला “भाऊजी” म्हणण्याची वेळ आली होती त्यानेच मला “अहो” म्हणायची वेळ आणली. नवरात्र बद्दल सांगायचं झालं तर मी अंबड येथीलआहे त्यामुळे मत्स्योदरी देवी हेच दैवत !जत्रेत जाण्यासाठी पैसे लागायचे आणि हे पैसे आम्ही कपड्याच्या दुकानात कपड्यांच्या घड्या घालून जमा करत होतो, याचा आनंद काही वेगळाच होता. पूर्वी देवीच्या पूजेचा मान ,अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता तो बदलून आता समाजातील सर्व घटकांना संधी मिळायला लागली आहे हा एक खूप छान निर्णय झाला आहे-सौ.पुदिना( पुनम दीपक नाईक) सविस्तर मुलाखत खलील व्हिडिओमध्ये.
“रणरागिणी 2024”, कोण म्हणतं नवरा माझा खोडकर? लाडक्या बहिणींची संख्या वाढल्यामुळे कोणाच्या बायकोला झालाआनंद? कोणाचा झाला प्रेम विवाह? शिक्षण घेतानाच कोणाचे जुळले टिपण? 17 वर्षाची कोणती मुलगी बनली कर्णबधिर,मूकबधिर आई-वडिलांचा “दिवा”?कोण म्हणतं आरेला कारे केलं पाहिजे! कोणती यशोदा सांभाळत आहे वारकरी संस्थेतील विद्यार्थी ? कर्तुत्ववान आणि प्रेरणादायी महिलांची मालिका?पहा फक्त Edtv jalna news वर.*www.edtvjalna.com
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172