रणरागिनी: “त्यांना” मला बाय-बाय करायची संधीच मिळत नाही, मी सावित्रीची लेक- सौ. विद्या सत्यप्रकाश कानडे-पाथारे
जालना- महिलांसाठी शिक्षणाचे दारे खुले करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचे माहेर असलेल्या नायगाव ची मी माहेरवाशी, त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन सर्वजण उच्चशिक्षित आहोत आणि शिक्षणाचा वारसा पुढे सुरू आहे. चांगल्या पगाराच्या खाजगी नोकरी मिळालेली असताना समाजाचं काम करण्याची इच्छा स्वस्त बसू देत नव्हती त्यामुळे त्या नोकरी सोडून शासकीय सेवक येण्याच्या ठरवलं आपण घेतलेला निर्णय योग्य ठरला असं आता वाटत आहे जालना जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता हे जबाबदारीचे पद सांभाळत असताना ग्रामीण भागातील जनतेला शासकीय योजनेच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था करता येते याचा समाधान आहे. काम करत असताना आरोप प्रत्यारोप टीका होतच असतात त्याला ओलांडून पुढे जायचं असतं आणि नवीन आव्हाने स्वीकारायचे असतात.
नोकरीच्या कार्यकाळात खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा हे चारही विभाग पाहिले आणि सर्वत्र देवीवर असलेली श्रद्धा सारखीच असल्याचा अनुभव आला आहे. एक मात्र नक्की की नवरात्रीच्या निमित्ताने सामाजिक एकोपा जपला जातो. या एकोप्याचे फार मोठे महत्त्व आहे. नोकरीच्या निमित्ताने घरी कमी वेळ द्यायला मिळतो, परंतु तीन वर्षाचा मुलगा मात्र न चुकता सकाळी कार्यालयात येताना बाय बाय करतो, ही संधी मात्र माझ्या नवऱ्याला कधी मिळाले नाही, उलट मीच कधीतरी घाई गडबडीत त्यांना बाय बाय करून निघून येते”-सौ.विद्या सत्यप्रकाश कानडे.
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172