Advertisment
Jalna DistrictRanraginiजालना जिल्हाराज्य

रणरागिणी: माझा कोणावरही राग नाही, मी “त्यांच्यासाठी” 56 भोग केले आहेत.- सौ.उर्मिला श्रीकांत पांगारकर

जालना- नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण ,पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण, डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरण या सर्व प्रकरणांशी “सनातन” चा संबंध असल्याचा आरोप आणि या आरोपावरून सनातनचे साधक म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांना दिनांक 18 ऑगस्ट 2018 रोजी संभाजीनगर येथून ताब्यात घेतले होते. ते आजही न्यायालयाच्या ताब्यात आहेत. या सहा वर्षाच्या कालखंडामध्ये श्रीकांत पांगारकर यांची पत्नी सौ. उर्मिला पांगारकर यांनी कोणत्या संकटांना तोंड दिले? आपल्या पति बद्दल काय मत आहे? नातेवाईकांनी कशी साथ दिली? हा सर्व प्रवास सांगितला आहे Edtv news च्या नवरात्रोत्सवानिमित्त मागील नऊ दिवसांपासून प्रकाशित केलेल्या ” रणरागिणी”च्या आज विजयादशमी निमित्त  समारोपाच्या विशेष भागामध्ये.

त्या बोलत होत्या,” माझा कोणावरही राग नाही, अगदी देवावर देखील. जे झालं ते आमचे भोग होते म्हणून ते सहन करत आहोत, आणि प्रत्येक गोष्ट मी देवाला सांगत होते त्यामुळे मला कधीच त्रास झाला नाही, परंतु वाईट मात्र नक्की वाटत होतं. माझे पती खंबीर आहेत त्यामुळे मी देखील खंबीर झाले आणि त्याहीपेक्षा पुढे जाऊन माझी मुलगी आता खंबीर झाली आहे. मागच्या सहा वर्षाच्या परिस्थितीमध्ये आम्ही तिला धीर द्यायचा तर तीनेच आम्हाला धीर दिला आहे. समाजातील अनेक महिला सांगायच्या की कशाला करतेस देव देव? एवढी संकटे आली असताना. परंतु मी मात्र त्यांचे ऐकले नाही आणि पूर्वी करत होते त्यापेक्षाही श्रीकृष्ण समोर बसून मी सर्व काही त्याला सांगत असायचे .त्यामुळे आज व्यवस्थित व्हायला लागलं आहे. पतीला जे पदार्थ आवडत होते ते मागील सहा वर्षात आम्ही कधीही तयार केले नाहीत. अशा सर्व परिस्थितीमध्ये महत्त्वाची साथ मिळाली ती आमच्या दादा वहिनींची आणि अशोकअण्णा पांगरकर यांची”-सौ. उर्मिला श्रीकांत पांगारकर.( संपूर्ण मुलाखत पहा हा वरील व्हिडिओमध्ये)niramy

 

nrg

https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button