“त्या” नराधमाला 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी; संतप्त वकिलाची आरोपीला न्यायालयातच मारहाण, आरोपीची घेईना कोणी वकिली

जालना- चंदंनझीरा भागात असलेल्या मातोश्री नगर मध्ये नऊ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला न्यायालयाने 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. दरम्यान न्यायालयाने निर्णय देताच न्यायदान कक्षाच्या बाहेर पडताच एका वकिलाने आरोपीला मारहाण केली त्यामुळे थोडा वेळ पोलिस आणि वकिलांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान तालुका पोलीस ठाण्यात आल्यानंतर हे प्रकरण मिटले आहे.
प्राप्त माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी आदित्य सुभाष जाधव वय 19 वर्ष हा रविवार दिनांक 13 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत जेवणासाठी बाहेर गेला होता. दहा वाजेच्या सुमारास परत आल्यानंतर त्याने पीडित मुलीला आणि तिच्या आईला घरी आलेले पाहिले आणि त्यानंतर आई एकटीच बाहेर गेल्याचेही पाहिले. ही संधी साधून त्याने मुलीला उचलून बाहेर नेले आणि कुकर्म केले. मुलीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला परंतु याच्यापुढे तिचा जोर कमी पडला. दरम्यान पोलिसांच्या वतीने बाजू मांडताना न्यायालयाला सांगितले की आरोपीचे कपडे आणि त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक आहे. पोलिसांची ही मागणी न्यायालयाने मान्य करत दिनांक 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. आरोपीच्या वतीने कोणताही वकील हजर न झाल्यामुळे न्यायालयाने कायद्यानुसार आरोपीची बाजू मांडण्यासाठी तात्पुरता वकीलही दिला आहे, जो वकील आरोपी जोपर्यंत वकील नियुक्त करत नाही तोपर्यंत हे काम करेल.
न्यायालयातच मारहाण– न्यायाधीशांनी आपला निर्णय दिल्यानंतर पोलीस आरोपीला न्यायदान कक्षाच्या बाहेर घेताना चौकटीच्या बाहेर आल्याबरोबरच एका वकिलाने आरोपी सोबत मारहाण केली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या वकिलाला ताब्यात घेतले. त्यानंतर वकील आणि पोलीस एकत्र जमा झाले आणि न्यायालयाच्या पोर्चमध्येच तणाव निर्माण झाला .हा तणाव सुरू असतानाच पोलिसांनी वकिलाला तालुका पोलीस ठाण्यात आणले. तिथे वकील आणि पोलिसांमध्ये झालेल्या चर्चेनुसार हे प्रकरण मिटले आहे.
सविस्तर बातमी वाचनासाठी खालील पर्याय
https://whatsapp.com/channel/0029Va9fkuo4Y9ljnnBTX80w
App on play store,yt-edtvjalna
–www.edtvjalna.com
https://www.instagram.com/edtv_jalna?utm_source=qr&igshid=MzNlNGNkZWQ4Mg==
-दिलीप पोहनेरकर,9422219172