कारागृहातून परतताच श्रीकांत पांगारकर यांची राजकारणात घर वापसी

जालना- कारागृहातून परतताच शिवसेनेचे माजी नगरसेवक श्रीकांत पांगारकर यांनी पुन्हा शिंदे सेनेमध्ये प्रवेश केला आहे. शिंदे सेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या निवासस्थानी आज या प्रवेशाचा कार्यक्रम झाला. नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरण, पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरण आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोळकर या प्रकरणांमध्ये श्रीकांत पांगारकर यांचा हात असल्याचा आरोप एटीएसने ठेवला आहे. श्रीकांत पांगारकर हे सहा वर्षाचा कारावास बघून मागील महिन्यात ते जामिनावर सुटले आहेत ,त्यांच्यावर सनातन संस्थेचे साधक आहेत असाही आरोप त्यांच्यावर आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172