Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

निवडणुकीच्या पहिल्याच प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 649 कर्मचाऱ्यांना मिळणार नोटीस चे “बक्षीस”!

जालना -विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. एकीकडे उमेदवार गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत तर दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणा या नवरदेवांच्या स्वागताची तयारी करत आहे. त्यांच्या या तयारीसाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज विधानसभा निवडणूक 2024 चे पहिले प्रशिक्षण पार पडले .या पहिल्याच प्रशिक्षणाला 649 अधिकारी -कर्मचाऱ्यांनी दांडी मारली. त्यामुळे त्यांना आता प्रशासनाच्या वतीने नोटीस रूपात बक्षीस दिल्या जाणार आहे आणि त्यांना पुन्हा प्रशिक्षणासाठी बोलावले जाणार आहे.

आज पहिला प्रशिक्षणासाठी पाच विधानसभा मतदारसंघातून 9787 अधिकारी कर्मचाऱ्यांना वॉरंट पाठवण्यात आले होते .त्यापैकी 9 हजार 131 अधिकारी कर्मचारी उपस्थित झाले आणि उर्वरित 649 अधिकारी कर्मचाऱ्यांनी या प्रशिक्षणाला दांडी मारली. त्यामुळे यांना आता पुन्हा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे आणि योग्य खुलासा नाही आला तर त्यांच्यावर कारवाई देखील होणार आहे. तसेच या कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा प्रशिक्षण आयोजित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. आज झालेल्या या प्रशिक्षणामध्ये मतदान केंद्राध्यक्ष, सह मतदान केंद्राध्यक्ष आणि इतर मतदान अधिकारी दोन आणि तीन यांना प्रशिक्षण देण्यात आले. जालन्याचे उपविभागीय अधिकारी श्रीमंत हरकळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, निवडणूक अधिकारी श्रीमती मनीषा दांडगे, जालनाच्या तहसीलदार श्रीमती पवार, घनसावंगीच्या तहसीलदार श्रीमती योगिता खटावकर अंबड चे तहसीलदार विजय चव्हाण आदींची उपस्थिती होती.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button