Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

निवडणूक प्रशिक्षणाला दांडी तेरा, कर्मचाऱ्यांवर छ. संभाजीनगरला गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक 2024 च्या प्रशिक्षणासाठी लेखी आदेश आणि नोटीस बजावूनही प्रशिक्षणाला दांडी मारणाऱ्या 13 कर्मचाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजी नगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 32 , 134 लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 अंतर्गत छत्रपती संभाजी नगर विधानसभा 108 , निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार मुकुंद बाबुराव उन्हाळे. यांनी हा गुन्हा नोंद केला आहे. छत्रपती संभाजी नगरच्या वेदांत नगर पोलीस हा गुन्हा नोंद आहे. असाच प्रकार जाण्यात देखील झाला होता पहिल्या प्रशिक्षणाला 649 कर्मचाऱ्यांनी दांडी मारली परंतु अद्याप पर्यंत कोणावरही कारवाई करण्यात आली नाही.

कलम 134 म्हणजे काय?– निवडणूक संदर्भात अधिकृत कर्तव्याचा भंग म्हणजेच ज्या व्यक्तीला हे कलम लागू होते, ती व्यक्ती वाजवी कारणाशिवाय कोणत्याही कृत्यासाठी दोषी असेल किंवा त्याच्या अधिकृत कर्तव्याचे उल्लंघन केल्यावर दोषी असेल अशा कर्मचाऱ्याला पाचशे रुपये पर्यंत दंड करण्याची तरतूद या लोकप्रतिनिधी अधिनियम 1950 मध्ये आहे.

छत्रपती संभाजी नगर येथील अमोल सोनवणे कनिष्ठ लिपिक उपसंचालक शिक्षण विभाग ,अमोल ताठे कनिष्ठ लिपिक मुख्य प्रशासकीय अधिकारी उपसंचालक आरोग्यसेवा ,मोगल मोईज बेग लिपिक क्षेत्रीय डेरी विकास अधिकारी, योगेश कुलकर्णी लिपिक लघु पाटबंधारे विभाग ,स्वप्नील कुलकर्णी कनिष्ठ लिपिक लघु पाटबंधारे विभाग, यांच्यासह प्रदीप जाधव, मिर्झा अकबर बेग, शेख शौकत नबी ,सय्यद इरशाद, रियाज शेख, टी. एस. चव्हाण ,ज्ञानेश्वर कड, श्रीमती नंदा विनायक राठोड यांचा समावेश आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button