पतीच्या निधनानंतर पंधरा वर्षांनी जन्म दिलेल्या अनैतिक अर्भकाचा आईनेच नाळेने गळा आवळून केला खून; झाली जन्मठेप
जालना- परतुर तालुक्यातील मोसा या गावच्या एका तरुणीचा विवाह घनसावंगी तालुक्यातील शेवगळ तांडा येथे झाला होता. लग्नानंतर तिला आज एक तेरा वर्षाचा ही मुलगा आहे. तो शिक्षणासाठी इतर ठिकाणी राहतो. पंधरा वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले आणि सन 2022 -23 मध्ये या महिलेचे अनैतिक संबंध जुळले. या संबंधातून जन्मलेल्या अनैतिक स्त्री जातीच्या अर्भकाचा खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. जे. जोशी यांनी या महिलेला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
या अर्भकाला जन्म देण्यापूर्वी ही महिला आपल्या माहेरी म्हणजेच मोसा या गावी आली होती .या संबंधातून दिनांक 6 मे 2023 रोजी संगीताने स्त्री जातीच्या अर्भकाला जन्म दिला. हे अर्भक जन्माला येताच त्याची नाळ कापून त्याच नाळेने या अर्बकाच्या आईने गळा आवळला आणि या अर्भकाला घराशेजारीच असलेल्या नालीमध्ये फेकून दिले .या कामी महिलेच्या आईने देखील तिची मदत केली. दरम्यान सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास याच गावातून जात असलेल्या एका सुज्ञ नागरिकाने हे अर्भक नाली मध्ये तरंगताना पाहिले आणि परतुर पोलिसांना याविषयी माहिती दिली. परतुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन गट्टूवार यांनी तातडीने सूत्र हलवून घटनास्थळाचा पंचनामा केला. अर्भकाला वाटुर येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यावेळी डॉक्टरांनी हे अर्भक जन्मले त्यावेळी जिवंत होते आणि नंतर गळा घोटला गेला आहे अशी माहिती दिली. त्या अनुषंगाने या सर्व प्रकरणाचा तपास करत असताना अतिरिक्त सरकारी अभियोक्ता जयश्री सोळंके यांनी 14 साक्षीदारांची तपासणी केली. यामध्ये डॉक्टरांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या .सर्व युक्तिवाद झाल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायमूर्ती ए. जे. जोशी यांनी अर्भकाची आई हिला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे तर तिला मदत करणाऱ्या तिची आईची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172