Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

कोणाला मिळणार गुरूंचे आशीर्वाद? गुरुपुष्यामृत मुहूर्तावर अर्ज दाखल

जालना-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज 20 उमेदवारांनी 26 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण 25 उमेदवारांचे 32 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

            99-परतूर विधानसभा मतदार संघासाठी  4 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात आसाराम जिजाभाऊ बोराडे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. 100-घनसावंगी मतदारसंघासाठी 3 उमेदवारांनी 4 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात राजेश अंकुशराव टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार),  मनिषाताई राजेशभैय्या टोपे (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार)  यांचा समावेश आहे. 101-जालना विधानसभा मतदार संघासाठी  4 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात अर्जुनराव पंडितराव खोतकर (शिवसेना), कैलास किसनराव गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस), संगीता कैलास गोरंट्याल (इंडियन नॅशनल काँग्रेस) यांचा समावेश आहे. 102- बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी 7 उमेदवारांनी 8 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), कुचे नारायण तिलकचंद (भारतीय जनता पार्टी) यांचा समावेश आहे. 103-भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघासाठी  2 उमेदवारांनी 5 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात श्रीरंगराव रंगनाथराव जंजाळ (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार) यांचा समावेश आहे.  याप्रमाणे आज एकुण 26 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

            आजपर्यंत एकूण 312 इच्छुक उमेदवारांना 750 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर  पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल शनिवार दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहिर केला जाणार आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button