वाजवा तुतारी हटवा टक्केवारी! बदनापूर विधानसभा मतदारसंघात आघाडीच्या उमेदवाराचा नारा
बदनापूर- जालना जिल्ह्यातील बदनापूर विधानसभा मतदारसंघातून आघाडीच्या वतीने शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बबलू चौधरी हे निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत. त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी झालेल्या जाहीर सभेमध्ये आमदार रोहित पवार यांनी भाजपाच्या विद्यमान आमदारावर चांगलीच टीका केली. “वाजवा तुतारी हटवा टक्केवारी” असा नाराच त्यांनी दिला आहे. भर उन्हामध्ये दोन तास नागरिकांनी या सभेला गर्दी केली होती. आत्तापर्यंत दोन वेळा संधी मिळूनही अपयश पदरी पडलेल्या बबलू चौधरी यांनी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नशीब आजमावल आहे आणि सद्य परिस्थितीमध्ये त्यांना आघाडीतील सर्वच नेत्यांचा पाठिंबा असल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. एकंदरीत आजची सभा गाजली ती टक्केवारीवरून.
हा पाठिंबा दर्शविण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आमदार रोहित पवार हे प्रमुख उपस्थितीत होते त्यासोबत काँग्रेसचे आमदार डॉक्टर कल्याण काळे राष्ट्रवादीचे माजी मंत्री तथा घनसावंगी चे आमदार राजेश टोपे उद्धवशेनेचे जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर शिवसेनेचे पदाधिकारी जयप्रकाश चव्हाण आदींची उपस्थिती होती.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172