परतुर मध्ये लढत तर होणारच; मैत्रीपूर्ण असो अथवा बंडखोरी करून ;काँग्रेस आणि ठाकरे सेना आमने-सामने
परतुर- जालना जिल्ह्यातील परतुर आणि घनसावंगी मतदारसंघाकडे पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. परतुर मध्ये लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. परंतु अद्याप पर्यंत घनसांगवीतून भाजपा किंवा शिंदे सेनेचा उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे येथील चित्र स्पष्ट होणे बाकी आहे. परतुर विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर आत्तापर्यंत काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ यावेळी ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ए. जे. बोराडे यांना बहाल केला आहे .त्यामुळे या तालुक्यात काँग्रेस जिवंत ठेवणाऱ्या माजी आमदार तथा काँग्रेसचे माजी जिल्हाप्रमुख सुरेशकुमार जेथलिया हे चांगले जिद्दीला पेटले आहेत आणि मैत्रीपूर्ण असो अथवा बंडखोरी करून लढण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यांची ही लढत एकीकडे मित्र पक्षाच्या म्हणजेच हातात मशाल घेतलेले बोराडे यांच्याशी आहेत तर दुसरीकडे भाजपाचे प्रस्थापित आमदार बबनराव लोणीकर यांच्या सोबत आहे.
परतुर तालुक्यात 2009 शिवसेनेसोबत बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडून आले होते . त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार बबनराव लोणीकर यांचा 11हजार मतांनी त्यांनी पराभव केला होता परंतु त्यावेळी देखील श्री जेथलिया यांच्यावर कोणतीही कारवाई करायची हिम्मत उद्धव ठाकरे यांनी दाखविली नाही. पाच वर्ष अपक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आणि नंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मदत करण्यासाठी काँग्रेसमध्ये गेले .2014 आणि 2019 मध्ये सलग दोन वेळा त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले, असे असतानाही परतुर तालुक्यामध्ये त्यांनी काँग्रेसला जीवंत ठेवले आणि आज ज्यावेळी निवडणूक लढायची वेळ आली त्यावेळी काँग्रेसला डावलल्या गेले ही खदखद सुरेश जेथलिया यांच्या मनात आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेच्या सेनेने ए. जे. बोराडे यांना जरी तिकीट दिले असले तरी त्यामध्ये अजून बदल होऊ शकतो किंवा काँग्रेसलाही ही जागा सुटू शकते असा आशावाद सुरेश जेथलिया यांना आहे. तसे जरी नाही झाले तरी निवडणूक अटळ आहे असेही ते सांगतात .एवढेच नव्हे तर ग्रामीण भागातील दौरे, प्रचार साहित्य, याची देखील त्यांनी तयारी केलेली आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये अपक्ष असताना त्यांना 42 हजार 702 मते पडली होती तर 2014 मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढल्यानंतर देखील 42577 मते पडली होती. म्हणजेच अपक्ष असताना देखील त्यांनी पक्षाच्या तिकिटापेक्षा 125 मते जास्त मिळवून विजय मिळवला होता.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172