आमदार भरती :आज पर्यंत 130 उमेदवारांचे अर्ज ;घनसावंगी मध्ये सर्वात जास्त उमेदवार
जालना-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आज 99 उमेदवारांनी 122 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे आजपर्यंत एकुण 130 उमेदवारांचे 179 नामनिर्देशन अर्ज स्विकारण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.
99-परतूर विधानसभा मतदार संघासाठी 16 उमेदवारांनी 23 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात बबनराव दत्तात्रय यादव (लोणीकर) यांचा समावेश आहे. 100-घनसावंगी मतदारसंघासाठी 24 उमेदवारानी 29 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात राजेश अंकुशराव टोपे यांचा समावेश आहे.
101-जालना विधानसभा मतदार संघासाठी 23 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात बाबासाहेब उगले, अन्वर कुरेशी, अरविंद बाळासाहेब देशमुख यांनी अपक्ष, मिलिंद बालू बोर्डे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), अहेमद रहीम शेख (अपक्ष), सय्यद इरफान (अपक्ष), विश्वंभर भानुदास तिरुखे (अपक्ष), प्रशांत भाऊसाहेब वाढेकर (अपक्ष), बाबासाहेब वानखेडे (अपक्ष), धैर्यशील अरविंद चव्हाण (अपक्ष), कैलास किसनराव गोरंट्याल २ अर्ज (इंडियन नॅशनल काँग्रेस) , डेव्हिड घुमारे २ अर्ज (वंचित बहुजन आघाडी), विशाल लक्ष्मण हिवाळे (अपक्ष), भास्कर शेषराव बोर्डे (अपक्ष), अग्रवाल रवी गोवर्धन (अपक्ष), विकास लहाने (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक ), योगेश दत्तू गुल्लापेली २ अर्ज (ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक व अपक्ष), पूजा योगेश गुल्लापेली२ अर्ज(ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक व अपक्ष), रतन आसाराम लांडगे (अपक्ष), योगेश कदम (अपक्ष), गणेश तुळशीराम शिंदे (अपक्ष), गणेश दादाराव कावळे (अपक्ष) यांचा समावेश आहे. 102- बदनापूर विधानसभा मतदारसंघासाठी 15 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात शैलेंद्र सुदाम मिसाळ (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक), सुशिलकुमार श्रीरंगराव रूपवते (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), कुचे नारायण तिलकचंद (भारतीय जनता पार्टी), आदमाने दिनेश दत्तात्रय (रिपब्लिकन सेना), सतीश शंकरराव खरात (वंचित बहुजन आघाडी), अँड भास्कर बन्सी वाघमारे (शिवसेना) आणि शैला फ्रान्सिस निकाळजे (राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार)
यांचा समावेश आहे. 103-भोकरदन या तीन विधानसभा मतदार संघासाठी 21 उमेदवारांनी 24 नामनिर्देशन अर्ज दाखल केले यात संतोष रावसाहेब दानवे (भाजपा), रमेश पाटीलबा गव्हाड (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), राहुल जालिंदर छडीदार (बहुजन समाज पार्टी) यांचा समावेश आहे.
याप्रमाणे आज एकुण 123 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.
संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. बुधवार, दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 पर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. तर बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीचा निकाल शनिवार दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहिर केला जाणार आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172