…म्हणून मनोज जरांगे यांना टाकावा लागला रिटर्न गियर ? तर आ.टोपे प्रतिस्पर्धी -रासपाचे उमेदवार ह.भ.प. रमेश महाराज वाघ
जालना- घनसावंगी विधानसभा मतदारसंघात आज तरी चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. शरद पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश टोपे, शिंदे सेना गटाचे उमेदवार हिकमत ऊढाण आणि भाजपामधून बंडखोरी केलेले साखर कारखानदार सतीश घाडगे यांच्यानंतर आता रासपाने आपली उमेदवारी ओबीसी समाजाचे ह. भ. प. रमेश महाराज वाघ यांना दिली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. तीन उमेदवार हे मराठा समाजाचे तर चौथा उमेदवार हा ओबीसी समाजाचा असणार आहे. यासंदर्भात आज रमेश वाघ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचा प्रमुख रोष होता तो विद्यमान आमदार राजेश टोपे यांच्याकडे. त्यानंतर त्यांनी आरोप केले ते मनोज जरांगे यांच्यावर आरोप करताना श्री. वाघ म्हणाले की कोणत्या एका जातीवर समाजावर राजकारण करता येत नाही ,हे मनोज जरांगे यांच्या लक्षात आल्यामुळेच त्यांनी आता रिटर्न गेर टाकला आहे आणि गरीब ओबीसी , दलित, मुस्लिम समाजाला भडकवण्यासाठी नवीन फॅक्टर सुरू केला आहे. आणखी काय आरोप केले रमेश महाराज वाघ यांनी पाहूया पुढील व्हिडिओमध्ये.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172