रोखपालाने केली लक्ष्मीपूजनापूर्वीच तिजोरी “साफ”; चोरी झाल्याचा केला बनाव
जालना-जुना मोंढा भागात असलेल्या आदिती अर्बन कॉपरेटिव सोसायटीच्या तिजोरीला लक्ष्मीपूजनापूर्वीच रोखपालाने “साफ” केले. या सोसायटीमधील अन्न दोन कर्मचारी देखील यामध्ये सहभागी झाले, एवढेच नव्हे तर यापूर्वी बनावट सोने ठेवून कर्जही त्यांनी घेतले. तिजोरीला फटाक्याचा धूर देऊन जळाल्याचा बनावा देखील केला. त्यासोबत शटर चे कुलूप बाहेर नेऊन तोडून आणले आणि शटर समोर टाकून शटर तोडल्याचाही देखावा केला परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या चार तासांमध्ये सोसायटीच्या रोखपालासह अन्य दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेऊन वाटाघाटी केलेली रक्कमही जप्त केली आहे. यामध्ये या सोसायटीचा रोखपाल गोवर्धन विष्णू सवडे वय 22 वर्ष राहणार बाजी उम्रद तालुका जालना, तसेच त्याचा साथीदार लक्ष्मण नारायण डोंगरे वय 26 वर्ष राहणार मौजपुरी आणि जगदीश अनंता लोलेवार राहणार लक्ष्मीनारायणपुरा यांचा समावेश आहे आणि अन्य एक साथीदार बाहेरचा आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172