तलाठ्याने काल मागितली लाच; आज अडकला लाचेच्या जाळ्यात
जालना- शहरातील एका रहिवाशाने शहरातच घेतलेला भूखंड आपल्या नावावर करून घेण्यासाठी तलाठ्याकडे विहित नमुन्यात अर्ज केला. परंतु भूखंड काही नावावर होत नव्हता . त्यामुळे त्याने तलाठ्याशी संपर्क केला त्यानंतर तलाठ्याने 25 हजार रुपयांची लाच मागितली. लाच मागणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज रंगेहात पकडले.
जालना शहर सज्याचे तलाठी दुर्गेश गणेश गिरी वय 40 वर्ष यांची नियुक्ती सध्या तहसील कार्यालय जालना येथे आहे. त्यामुळे जालना शहरात सर्वे नंबर 284 मधील प्लॉट क्रमांक 40 च्या मालकांनी खरेदी केलेल्या या भूखंडाचा फेर स्वतःच्या नावावर करण्यासाठी तलाठी कार्यालयाकडे विहित नमुन्यात कागदपत्रांची पूर्तता केली. परंतु तलाठ्याची हे काम करण्याची इच्छा नव्हती म्हणून काल दिनांक पाच रोजी तलाठी आणि या भूखंडाच्या मालकांमध्ये बोलणी झाली आणि तलाठ्याने 25हजार रुपयांची लाच मागितली. परंतु भूखंड मालकाची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लगेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संपर्क केला आणि या विभागाच्या अधिकाऱ्यांनी या मागणीची शहानिशा केली .त्यावेळी तलाठ्याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. सदरील लाच आज दिनांक सहा रोजी तहसील कार्यालयात तलाठ्याकडे दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला आणि या तलाठ्याला रंग हात पकडले. दुर्गेश गिरी या वर्ग तीनच्या शासकीय कर्मचाऱ्यावर कदीम जालना पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172