Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

cm शिंदे गद्दार,फडणवीस नारद,सिरसाट वाचाळवीर – शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेची मिमिक्री

घनसावंगी- घनसावंगी विधानसभा मतदार संघातून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस कडून विद्यमान आमदार राजेश टोपे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारासाठी गुरुवार दिनांक सात रोजी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची जाहीर सभा झाली. या सभेला गर्दी तर होती परंतु ती मिमिक्री पाहण्यासाठी होती का विचार ऐकण्यासाठी हे सांगता येणे कठीण आहे. आमदार राजेश टोपे यांनी निवडून देण्याचे आवाहन केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी 50 मिनिट उपस्थितांचे मनोरंजन केले. त्यामध्ये राजेश टोपे यांनी कोरोना काळात कशी समर्थपणे भूमिका निभावली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या आजारपणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कशी फोडाफोडी केली, त्याला खतपाणी घालणारे नारद म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याची पाठराखण करणाऱ्या फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची नक्कल करून शिवसेनेचे शिरसाठ हे कसे वाचाळवीर आहेत या सर्वच बाबतीचा उहापोह मिमिक्रीच्या माध्यमातून त्यांनी उपस्थितांसमोर मांडला .खरंतर मिमिक्री ही शब्दात मांडता येत नाही ती पहावी आणि ऐकावीच लागते त्यासाठी सुषमा अंधारे यांनी घनसावंगी येथील केलेले हे भाषण.

माइक समोर सुषमा अंधारे यांची “उंची” कमी पडल्यामुळे त्यांची “उंची” वाढविण्यासाठी चौरंगाची ही व्यवस्था करण्यात आली होती.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button