अमित शहा…खाऊ- उद्धव ठाकरे; पिता पुत्रांच्या वेगवेगळ्या टक्केवारीमुळे कंत्राटदार पळून गेले-बोराडे परतुर -मंठा विधानसभा मतदारसंघातील चित्र
परतुर- परतुर -मंठा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने ए. जे. बोराडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी महायुती आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. उपस्थित असलेल्या जनतेसोबत जात उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना…खाऊ म्हणत खालच्या पातळीपर्यंत टीका केली. त्यासोबत या मतदारसंघाचे उमेदवार बोराडे यांनी देखील भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांचे नाव घेऊन स्पष्ट टीका केली आणि दोघांचीही शासकीय कामात वेगवेगळे टक्केवारी आहे त्यामुळे कंत्राटदार पळून गेले एवढेच नव्हे तर भाजपामध्ये न येणाऱ्या कार्यकर्त्यांना ते त्रास देतात असा आरोपही बोराडे यांनी केला. सविस्तर बातमी पहा पुढील व्हिडिओमध्ये.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172