बदनापूर विधानसभा; 44 वर्षात चौथी महिला उमेदवार रिंगणात;जयश्री कटके कसा करणार दोन प्रस्थापितांच्या सामना?
बदनापूर – जालना जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर 1980 ला बदनापूर विधानसभा मतदार संघातून इंदिरा काँग्रेसच्या पहिल्या आणि महिला उमेदवार म्हणून श्रीमती शकुंतला शर्मा यांनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या. त्यानंतर आता 44 वर्षांमध्ये चौथी महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्या म्हणजे सौ.कटके जयश्री संजय. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून त्या निवडणूक लढवीत आहेत दरम्यानच्या काळात 1990 ला प्रशिलाबाई बंडू अंभोरे आणि 2004 ला कल्पना सर्जेराव शिंदे या दोन महिलांनी निवडणूक लढवली परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. आता निवडणूक लढवीत असलेल्या जयश्री संजय कटके यांना दोन प्रस्थापित उमेदवारांचे आव्हान पेलावे लागणार आहे. कसे पेरणार आहेत त्या हे आव्हान आणि काय आहे रणनीती जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच.
बदनापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये 226 गावांचा समावेश आहे . आत्तापर्यंत त्यांनी दीडशे गावांना भेट देऊन आपला प्रचार पूर्ण केल्याचे सांगितले आहे. सहा नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र राजुर येथील राजुरेश्वराचे दर्शन घेऊन त्यांनी प्रचाराला सुरुवात केली. पथनाट्य आणि प्रत्यक्ष भेटींवर त्यांचा जोर आहे. दोन प्रस्थापित आणि पैसेवाल्या उमेदवारांमुळे मला बुथवर माणसे देखील मिळणार नाहीत परंतु जनता स्वतः हे काम करील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172