जालन्याचे लोन देशभरात पसरले; परशुराम आर्थिक विकास महामंडळाची प्रत्येक राज्याची मागणी- कॅ. दामले
जालना-जालन्यात पहिले ब्राह्मण अधिवेशन झाले आणि त्यावेळेस पासून परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी होती. जालनेकारांनी सुरू केलेला हा लढा यशस्वी झाला आणि महाराष्ट्र शासनाने परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. जालन्याचे हे लोन आता देशभरात पसरला आहे. प्रत्येक राज्य हे परशुराम आर्थिक विकास महामंडळाची स्थापन करण्याची मागणी करीत आहे. असे प्रतिपादन परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले .जालन्यात ब्राह्मण सभेच्या वतीने दीपावली स्नेह मिलन आणि या आर्थिक विकास महामंडळासाठी झटणाऱ्या काही पदाधिकाऱ्यांचा सत्कार श्री. दामले यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विधीज्ञ चंद्रशेखर देशपांडे यांच्यासह सचिन वाडे पाटील ,जालना ब्राह्मण सभेचे अध्यक्ष कल्याणराव देशपांडे, डॉ.सुभाष भाले ,रमेश देहेडकर आदींची उपस्थिती होती.
हे महामंडळ स्थापन झाल्यानंतर श्री दामले यांची जालन्यात ही दुसरी भेट होती शासनाने जरी 50 कोटी मंजूर केले असले तरी एवढ्या निधीवरच न थांबता आणखी निधीची मागणी आपण करणार आहोत प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ब्राह्मण समाजातील मुला मुलींसाठी वसतिगृह सुरू करणे त्यासोबत पुरोहितांना दरमहा मानधन सुरू करणे या प्रमुख दोन गोष्टींसह ब्राह्मण समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासनाकडे भांडून निधी उपलब्ध करून घेणार असल्याचेही ते म्हणाले. हे महामंडळ स्थापन झाले असले तरी यामध्ये आणखी अनेक काही गोष्टी स्पष्ट होण्याचे बाकी आहे त्यामुळे अद्याप पर्यंत प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली नाही ती देखील लवकरच होईल असेही ते म्हणाले. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर. आर. जोशी यांनी केले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172