Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

“वॉकथॉन”च्या माध्यमातून मधुमेहाविषयी जनजागृती

जालना-जागतिक मधुमेह ( world Diabetes day)दिनानिमित्त 14 नोव्हेंबर रोजी जालना येथे “वाकथॉन”चे आयोजन करण्यात आलेहोते. हा उपक्रम जालना फिजिशियन असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सराफा बाजार, बडी सडक, राम मंदिर या मार्गावरून रॅली काढण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समारोप झाला.


या रॅलीत समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांनी सहभाग घेतला. मधुमेह हा अतिशय गंभीर आजार असून, त्याचे परिणाम शरीराच्या प्रत्येक अवयवावर होऊ शकतात. मधुमेहापासून बचावासाठी दररोज एक तास चालणे, संतुलित आहार आणि मेडिटेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ञ डॉक्टरांनी उपस्थित नागरिकांना व्यायामाचे महत्व आणि मधुमेहावर नियंत्रण ठेवण्याच्या उपायांबाबत मार्गदर्शन केले.डॉ. हितेश रायठ्ठा यांनी या आजारबद्दल मार्गदर्शन केले. जगात सर्वात जास्त मधुमेही भारतात आहेत. भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून संबोधले जाते. बदलती जीवनशैली आणि तनाव या आजाराला कारणीभूत ठरत आहे असे मत डॉ. हितेश रायठ्ठा यांनी मांडले. या रॅलीचे मुख्य उद्दिष्ट समाजात मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आणि या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे हे होते


यावेळी रोटरीचे प्रांतपाल डॉ. सुरेश साबू, फन रनर्स चे डॉ. संजय आंबेकर, आय एम ए चे अध्यक्ष डॉ संभाजी मुंडे, जालना फिजिशियन्स असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. अर्चना काबरा, आणि रोटरी क्लब ऑफ जालना चे अध्यक्ष दीपक बगडिया उपस्थित होते.
या रॅलीचे मुख्य उद्दिष्ट समाजात मधुमेहाबद्दल जनजागृती करणे आणि या आजाराविषयी असलेले गैरसमज दूर करणे हे होते.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button