मी कशाला सुरुंग लावू ? जनताच… -भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाटगे पाटलांची सडेतोड मुलाखत
घनसावंगी- गेल्या पंचवीस वर्षांपासून विद्यमान आमदार राजेश टोपे यांचा बालेकिल्ला असलेल्या घनसावंगी मतदारसंघाला तुम्ही सुरुंग का लावला? या थेट प्रश्नाला घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे bjp चे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार सतीश घाटगे पाटील यांनी देखील सडेतोड उत्तर दिलं आहे. पाटील म्हणाले “मी सुरूंग नाही लावला. त्यांच्या पंचवीस वर्षाची काळीकुट्ट कारकीर्द असल्यामुळे मतदारसंघाचे वाटोळे झाले, त्यावेळी जनता मजबूर होती. त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे मी सुरुंग नाही लावला तर आता जनताच आरडीएक्स चा स्फोट घडून त्यांची सत्ता उडवून देईल.”
यासोबतच edtv news च्या सडतोड प्रश्नांना घाडगे पाटलांनी देखील त्याच पद्धतीने उत्तर दिले आहेत बाहेरगावचे पार्सल परत पाठवा या विरोधकांच्या नाऱ्याला घाडगे पाटील म्हणाले ” मी ज्यावेळेस जन्माला आलो त्यावेळेस जालना आणि छत्रपती संभाजी नगर एकच जिल्हा होता त्यामुळे मी एकाच जिल्ह्यातला आहे आणि जरी विरोधकांना मी बाहेर गावचे पार्सल असेल असे वाटत असलो तरी माझी कर्मभूमी ही घनसावंगी तालुका आहे गेल्या पंधरा वर्षांपासून इथे कारखान्याच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आणि जनतेच्या विकासासाठी काम केले आहे त्यामुळे जन्मभूमी पेक्षा कर्मभूमी ही श्रेष्ठ आहे मी माझ्या कर्मभूमीत लढायला तयार आहे विरोधकांनी पळवाट काढून वेडेवाकडे बोलू नये विकासाची लढाई करून मला हरवावं काहीतरी वेडी वाकडी अफवा पसरवली तर जनताच त्यांना वेड्यात काढील राहायला विषयी कारखानदारीचा तर मतदार संघात फक्त तीन कारखाने आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी ज्या कारखान्याचा उल्लेख केला तो कारखाना नाही तर तिथे उसावर प्रक्रिया होईल आणि असे कारखाने जागोजागी पाहायला मिळतात. निवडून आल्यानंतर मी कोणत्याही पक्षात जाणार नाही मला मंत्री संत्री व्हायचं नाही प्रत्येकाची कुवत वेगळी असते जो माझ्या मतदार संघाचा विकास करेल त्याच्यासोबत मी काम करेल एवढेच नव्हे तर सध्या विरोधकांमध्ये चांगलीच घबराट सुटली आहे त्यामुळे उमेदवारी अर्ज भरतानाच माझ्या नावात साधर्म्य असलेल्या पाथरवाल्याच्या एका उमेदवाराला उभा केला आहे एवढेच नव्हे तर मी जी चिन्हे मागितली होती तीच चिन्ह त्याच उमेदवाराने कशी मागितली ही माहिती फुटली कशी याविषयी नियोजन निवडणूक आयोगाकडे तक्रार केले आहे त्यामुळे त्यांच्याकडे एका एका अपक्ष उमेदवारामुळे घबराट सुटली आहे आणि म्हणून ते छुपे वार करत आहेत”. अशी सडेतोड उत्तरे सतीश घाडगे पाटील यांनी दिली आहेत सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी वरील व्हिडिओला क्लिक करा.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172