उमेदवारांचे भवितव्य महिलांच्या हाती!कसं? कशी वाढली टक्केवारी ? जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर कसा आला? बंडखोर, जातिवादाचा त्रास झाला का?- काय म्हणाले जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ
जालना- सामाजिक- राजकीय वाद -विवादांसोबतच आता जालना प्रशासकीय पातळीवर देखील चर्चेत येणार आहे. त्याला कारण म्हणजे यावर्षी मतदानाची वाढलेली टक्केवारी 2019 च्या तुलनेत तब्बल साडेपाच टक्क्यांनी ही मतदानाची टक्केवारी वाढली आहे. यामध्ये विशेष म्हणजे महिलांचे मतदान वाढले आहे त्यामुळे उमेदवारांचे भवितव्य आता महिलांच्या वाढलेल्या मतदानावर ठरणार आहे. त्यासोबत महिलांनी केलेल्या या मतदानामुळे मतदानाच्या टक्केवारीत शालेय अभ्यासक्रमाप्रमाणे सांगायचं झालं तर B+ श्रेणी जालनाच्या मतदारांनी प्राप्त केले आहे. जालना जिल्हा आता महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ही एक जालनेकरांसाठी अभिमानाचीच बाब आहे. पहिल्या क्रमांकावर आहे तो कोल्हापूर जिल्हा जिथे76.25% दुसरा गडचिरोली तिथे73.68% तर जालनेकरांनी72.64% मतदान केलं आहे. कोल्हापूर गडचिरोली हे पूर्व पश्चिम असताना जालनाच्या जनतेने मात्र सुवर्णमध्य साधत तिसरा क्रमांक मिळवला आहे. हे मिळवण्यासाठी काय फॉर्मुले वापरले? हे कसं साध्य झालं? काही त्रास झाला का? आणि याचे गमक काय ? या सर्व बाबींविषयी माहिती जाणून घ्या जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून खालील मुलाखतीमध्ये.
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण 15 लाख 55 हजार 753 मतदार होते. त्यापैकी दहा लाख 43 हजार 407 मतदारांनी आपलं मतदान केलं. ही टक्केवारी 67.07. सन 2024 मध्ये एकूण मतदार आहेत 16 लाख 52 हजार 511 त्यापैकी 12 लाख 907 मतदारांनी आपला हक्क बजावला आहे याची टक्केवारी आहे 72.67. यामध्ये विभागणी केली परतुर सत्तर घनसावंगी 77 जालना 64 बदनापूर 74 आणि भोकरदन 77 अशी टक्केवारी येते. जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 42 तृतीय पंथीयांपैकी बारा तृतीय पंथी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172