कशी असेल आठ वाजता सुरू होणारी मतमोजणी!
जालना – भारत निवडणूक आयोगाचे निरीक्षक (सामान्य) जालना यांच्या उपस्थितीमध्ये जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदार संघामधील अंतर्गत मतमोजणीसाठी मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षकांचे सरमिसळीकरण (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101- जालना, 102-बदनापूर आणि 103- भोकरदन विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता होणार असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी दिली.
जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघासाठी दि.22 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता मतमोजणीस्थळी सर्व मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहायक आणि सुक्ष्म निरीक्षक अशा एकुण 425 अधिकारी-कर्मचाऱ्यांची त्या त्या विधानसभा मतदारसंघ स्तरावर रंगीत तालिम घेण्यात आली. तसेच भारत निवडणूक निरीक्षक, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षण घेण्यात आले. सर्व विधानसभेसाठी दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 8 वाजता सर्व विधानसभा मतदार संघामध्ये मतमोजणीस्थळी मतमोजणी करण्यात येणार आहे. पाच विधानसभा मतदारसंघासाठी पोस्टल बॅलेट मतमोजणी टेबल 39, पर्यवेक्षक 49, सहायक 47, सुक्ष्म निरीक्षक 49, एकुण मनुष्यबळ 145, ईटीबीपीएस मतमोजणी टेबलची संख्या 9, मतमोजणी पर्यवेक्षक 10, मतमोजणी सहायक 11, एकुण मनुष्यबळ 21, ईव्हीएम मतमोजणी टेबलची संख्या 70, मतमोजणी पर्यवेक्षक 85, मतमोजणी सहायक 90, सुक्ष्म निरीक्षक 84, एकुण मनुष्यबळ 259 आणि मतमोजणीसाठी लागणारे राखीवसह मनुष्यबळ एकुण 425 याप्रमाणे नेमणूक करण्यात आली आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172