Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

मनोज जरांगे फॅक्टरचा उलटा परिणाम? जालन्यात मविआचा सुपडा साफ, पाचही जागा महायुतीला; अर्जुन खोतकर यांनी दिला विरोधकांना लगेच इशारा

जालना-जालन्यात माजी मंत्री अर्जुन राव खोतकर यांनी विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा पराभव केला, घनसावंगी मध्ये माजी मंत्री राजेश टोपे यांनी दोन वेळा पराभूत केलेल्या हिकमत उढान यांनी तिसऱ्या वेळेस माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे यांचा पराभव केला उढान हे शिंदे सेनेचे उमेदवार होते. परतुर मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी उद्धव सेनेचे आसाराम बोराडे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचा पराभव केला. भोकरदन मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार संतोष दानवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या माजी आमदार चंद्रकांत दानवे यांचा पराभव केला. बदनापूर मध्ये भाजपाचे विद्यमान आमदार नारायण कुचे यांनी यापूर्वी दोन वेळा पराभूत झालेल्या बबलू चौधरी या शरद पवार गटाच्या उमेदवाराचा  पुन्हा एकदा पराभव केला आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे चा फॅक्टर चा उलटा परिणाम झालेला दिसत आहे आणि पाच पैकी पाच जागा या महायुतीने जिंकल्या आहेत. विजया संदर्भात नुकतेच विजयी झालेले उमेदवार अर्जुन खोतकर यांनी लगेच विरोधकांना इशारा दिला आहे . “स्वतः गाड्या फोडून माझी बदनामी करणाऱ्यांचे आता बघा मी काय करतो?”असं अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button