संघर्षयोध्याच्या लढ्याला दोनवर्षं पूर्ण; यश मिळाले तरीही योद्धा गेला बॅकफूटवर?
जालना- परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन व्हावे या ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी अन्य मागण्या संदर्भात मुहूर्तमेढ रोवल्या गेली ती 19 वर्षांपूर्वी जालना शहरात पहिले ब्राह्मण अधिवेशन घेऊन.
बहुतांश सामाजिक चळवळीचा “कार्यक्रम” होतो तशा पद्धतीने मराठवाड्याच्या बाहेर गेल्यानंतर या अधिवेशनाचा देखील कार्यक्रम झाला आणि तो प्रतिष्ठेचा प्रश्न होऊन मूळ उद्देश बाजूलाच राहिला आणि नको ते उद्देश, नको ती प्रतिष्ठा समोर आल्यावर कसे कार्यक्रम लागतात त्याचे जिवंत उदाहरण देखील आपल्या डोळ्यासमोर आहे. परंतु 19 वर्षांपूर्वीच्या या योगदानाला पुन्हा एकदा 28 नोव्हेंबर 2022 मध्ये खतपाणी घालण्याचे काम दीपक रणनवरे यांनी केले. जालना शहरात महाराष्ट्राचे लक्षवेधणारे आमरण उपोषण त्यांनी केले. त्याला प्रतिसादही प्रचंड मिळाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या उपोषणाला पाठिंबा मिळाला शासन दरबारी देखील याची नोंद घ्यावी लागली. परंतु नोंद घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी करेल ते शासन कसे? याच्या पाठपुराव्यासाठी पुन्हा एकदा दीपक रणनवरे यांनी 15 ऑगस्ट 2024 रोजी उपोषणाचे हत्यार उपसले .परंतु यावेळी त्यांना पूर्वीप्रमाणे समाजाचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यातच काही घटना अशा घडल्या की ज्यामुळे पूर्वी मिळालेला मान- सन्मान, प्रतिष्ठा ही देखील कमी झाली. का कमी झाली? काय घडलं या मध्यंतरीच्या काळात ?समाजाने का दिला नाही पाठिंबा आणि आता परशुराम आर्थिक विकास महामंडळ मिळाल्यानंतर पुढे काय अपेक्षा आहेत? या सर्व प्रश्नांची सडेतोड उत्तरे मिळवणारी ही विशेष मुलाखत. कारण आज दिनांक 28 नोव्हेंबर रोजी ब्राह्मण समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या उपोषणाला दोन वर्ष पूर्ण होत आहेत या द्वि वर्षपूर्ती निमित्त दीपक रणनवरे यांची घेतलेली ही विशेष मुलाखत.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. edtvjalna या youtube आपण फक्त व्हिडिओ देखील पाहू शकता.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172