Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

पोलीस असूनही न्यायालयासमोर अपघात; उभ्या असलेल्या वाहनाला चारचाकीची धडक; वाहन पडले खड्ड्यात

जालना- न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसाची नियुक्ती करण्यात आली आहे असे असतानाही रस्त्यावर उभे असलेल्या वाहनामुळे आज एका वकिलाला आपला जीव गमावण्याची वेळ आली होती.

 

जालना शहरातीलच एक ईरटीगा MH 21 CA5552 ही चार चाकी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास न्यायालयासमोरच असलेल्या प्रवेशद्वाराच्या बाजूला मुख्य रस्त्यावर उभी होती. त्याच दरम्यान न्यायालयातून आपले काम आटोपून अकोला  डाबकी रोड येथे राहणारे विधिज्ञ शैलेश जोशी हे आपले न्यायालयीन कामकाज आटोपून(MH 12 WU 3858) या थार कंपनीच्या वाहनातून बाहेर आले. दरम्यान प्रवेशद्वारातून वाहन वळवत असताना समोरून आलेल्या एका ऑटो  रिक्षाने हुलकावणी दिल्यामुळे वकिलाची गाडी याच रस्त्यावर उभी असलेल्या एर्टिगाला मागून भिडली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये जाऊन पडली. सुदैवाने या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी लगेचच या वाहनात अडकलेले वकील शैलेश जोशी आणि त्यांचे सहकारी सुभाष काळे यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात भरती केले आहे. न्यायालयासमोरच जिल्हा परिषद देखील आहे . त्यामुळे इथे अतिक्रमणांचा विळखा आहे आणि अतिक्रमणे असल्यामुळे दुचाकी आणि चार चाकी रस्त्यावरच उभ्या असतात आज अशाच या उभ्या असलेल्या चार चाकी मुळे वकिलाला आणि चार चाकी मधील काही जणांना जीव गमावण्याची वेळ आली होती.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button