संगीता लाहोटी खून खटला; मनुष्य किती हिंस्र बनू शकतो त्याचे उदाहरण म्हणजे हा खटला- ज्येष्ठविधीज्ञ उज्वल निकम
जालना- मनुष्य किती क्रूर बनू शकतो याचे उदाहरण म्हणजे संगीता लाहोटी यांचा नौकर भीमराव धांडे आहे. अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध सरकारी वकील उज्वल निकम यांनी दिली आहे. जालना शहरात उच्चभ्रू वस्तीत राहणाऱ्या संगीता लाहोटी यांचा खून दिनांक 14 डिसेंबर 2021 रोजी करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी सध्या जालना येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायमूर्ती श्रीमती वर्षा मोहिते यांच्यासमोर सुरू आहे सरकार पक्षातर्फे प्रसिद्ध विधीज्ञ उज्वल निकम ही बाजू मांडत आहेत आज सरकार पक्षातर्फे होणारी सुनावणी पूर्ण झाली आहे आणि लवकरच या खटल्याचा निकालही लागणार आहे. दरम्यान आरोपीच्या वतीने विधीज्ञ श्रीकांत घुले हे बाजू मांडत आहेत . दिनांक पाच डिसेंबरला ही सुनावणी सुरू होईल त्यानंतर काही दिवसातच संगीतालाहोटी यांच्या खून खटल्याचा निकाल लागणार आहे.
खटल्याची पार्श्वभूमी- मला फोन नंबर का देऊ दिला नाही असे म्हणत रागाच्या भरात 57 वर्षीय महिलेला चाकूने भोसकून स्वतः नाही विष पिल्याची घटना 14 डिसेंबर 2021 ला सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जालना शहरात घडली होती . भल्या पहाटे घडलेल्या या घटनेमुळे दिवसभर पोलीस प्रशासन चांगलेच कामाला लागले होते.
या प्रकरणातील तक्रारदार हर्षवर्धन अभय लाहोटी, वय 26 वर्षे शासकीय गुत्तेदार जालना, यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले होते की, त्यांचे काका अलोक लाहोटी यांनी त्यांच्या ओळखीच्या असलेल्या जितेंद्र नाथांनी यांना या प्रकरणातील आरोपी भीमराव निवृत्ती धांडे, राहणार मंमादेवी नगर, अंबड रोड जालना याला फोन नंबर देऊ नका असे सांगितले. लाहोटी यांच्या या वर्तणुकीचा धांडे याला राग आला, त्याने आलोक लाहोटी यांना मारहाण करून दगडाने घराच्या काचा फोडल्या. या प्रकारामुळे लाहोटी यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीचा राग मनात धरून पोलिसांनी सांगितल्यानुसार भीमराव धांडे याने वैद्यकीय तपासणी करायला न जाता सकाळी साडेआठ ते नऊ च्या सुमारास पुन्हा आलोक लाहोटी यांच्या पोस्ट ऑफिस जवळ घरांमध्ये प्रवेश केला आणि घरामध्ये असलेल्या संगीता अलोक लाहोटी, वय 57 यांना चाकूने भोसकून त्यांचा खून केला .याप्रकरणी सदर बाजार पोलिस ठाण्यात भादवि कलम 302 नुसार भीमराव धांडे याने खून केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे .त्यानंतर धांडे याने त्याच ठिकाणी स्वतः देखील विष पिऊन आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला, मात्र त्याला वेळीच मज्जाव करून रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172