डॉ. पांचाळ यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार
जालना- जालन्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे बीड जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे आज दिनांक 29 रोजी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे बीड येथे जाऊन हा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हे दिनांक 2 ते 27 डिसेंबर दरम्यान मसुरी येथे लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी येथे प्रशिक्षणासाठी जाणार आहेत त्यामुळे श्री पाठक यांना दिनांक 29 रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयातून कार्यमुक्त केले जाणार आहे. बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा अतिरिक्त कारभार म्हणून जालनाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी घेण्याचे आदेश छत्रपती संभाजी नगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काढले आहेत.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172