मालेगाव- माहूरगड बस आणि आयशरचा भीषण अपघात; दोन ठार 20 जखमी

जालना -जालना तालुक्यातील जालना ते सिंदखेड राजा दरम्यान असलेल्या नाव्हा गावाजवळ आज दुपारी मालेगाव कडून माहूरगड कडे जाणारी बस आणि सिंदखेड राजाकडून जालन्याकडे येणाऱ्या आयशरचा समोरासमोर भीषण अपघात झाला .या अपघातामध्ये दोनप्रवासी ठार झाले आहेत ,तर वीस प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी जालना रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या प्रवाशांची यादी खालील प्रमाणे.ठार झालेल्यांमध्ये पुरुषोत्तम पाटीलबा बाहेकर वय साठ वर्ष राहणार मेहकर जिल्हा बुलढाणा, आणि वैभव अशोक शेरकर वय 22 वर्ष राहणार सिंदखेड राजा या दोघांचा समावेश आहे.
या अपघातामध्ये मोहन दगडू राठोड ,सोमेश्वर भगवानराव, चंदा प्रभाकर शिरसाट ,भिवसन दौलत बोरकर ,पल्लवी राहुल वाघमारे ,अनुराग सुरेश पाईकराव ,विमल बाबुराव जाधव ,कस्तुरा मोहन राठोड, विलास नामदेव राठोड ,सिद्धार्थ नंदा जावळे, श्रीकृष्ण तुकाराम झुंबड, दिलीप नायबराव जाधव, कांताबाई महादेव इंगळे ,वैशाली लक्ष्मण जोगदंडे, हरिश्चंद्र रामलाल डोंगरे, समशेद शकील खान ,आशिया शकील खान, आरिया शकील खान ,हे प्रवासी जखमी झाले आहेत तर अन्य तीन प्रवासी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे .जखमी प्रवासी सध्या जालना येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172