54 वर्षाच्या या “तरुणाने” पार केली 405 किमीची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा; निमित्त होतं सैन्य दलाच्या विजय दिनाचे

जालना- वय वर्ष 54 जर असेल तर त्यांना काय म्हणणार? तरुण ती वृद्ध तुम्ही काहीही म्हणा परंतु भारतीय सैन्य दलाच्या वतीने विजयी दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेली 405 किमीची अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा त्यांनी पार केली आहे. महाराष्ट्रातील इतर स्पर्धकांसोबत मराठवाड्यातून ते एकमेव स्पर्धक होते ,ते आहेत जितेंद्र अग्रवाल आहे. (शुभेच्छा देण्यासाठी जितेंद्र अग्रवाल यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8767498413)
1971 मध्ये भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या अतुलनीय विजयानिमित्त भारतीय सैन्यदलाच्या वतीने 16 डिसेंबर हा ‘विजय दिवस’ म्हणून भारतभर उत्साहात साजरा केला जातो. भारतीय सैन्याने 2024 मध्ये पहिल्यांदाच ‘विजय दिनी’ 405 किमी अंतराची अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली होती. 6 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान झालेल्या या अल्ट्रा मॅरेथॉन मध्ये पंधरा स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये मराठवाड्यातून जितेंद्र अग्रवाल हे एकमेव होते. त्यांनी दहा दिवसांमध्ये 405 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केल्याने लेफ्टनंट जनरल धीरज शेठ यांच्या हस्ते त्यांना प्रशस्तीपत्र आणि मेडल देऊन गौरव करण्यात आला.
भारतातील नवतरुणांना, युवतींना तसेच सर्वसामान्य नागरिकांना सेनेविषयी आपुलकी आदर वृद्धिंगत व्हावा यासाठी या अल्ट्रा मॅरेथॉनचा आयोजन करण्यात आले होते. मुंबई येथून 6 डिसेंबर रोजी महाराष्ट्राची राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी 15 धावपटूंना हिरवा झेंडा दाखवला. मुंबई ते नाशिक, नाशिक ते अहिल्यानगर, अहिल्यानगर ते पुणे असा 405 किमीचा प्रवास धावपटूंनी पूर्ण केला. दररोज 50 किमी अंतर धावपटू पूर्ण करायचे. यादरम्यान प्रत्येक शहरामध्ये शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनी, अग्नीवीर तसेच युवक युवतींनी या धावपटूंचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले व धावपटूंबरोबर धावण्याचा सरावदेखील केला.
सर्व धावपटूंची व्यवस्था भारतीय सेनेमार्फत करण्यात आली. प्रत्येक शहरामध्ये धावपटूंना धावण्यासाठी रस्ता मोकळा करून दिला.या 405 किमी अल्ट्रा मॅरेथॉनसाठी सातारा येथील प्रशिक्षक शिव यादव यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. त्याचबरोबर पुणे येथील आहार सल्लागार देवयानी निकम यांनी आहाराबद्दल योग्य मार्गदर्शन केलं. तसेच पुणे येथील डीवायएसपी साईनाथ ठोंबरे , शिल्पा अग्रवाल व मुलगा करण अग्रवाल यांच्या पाठिंब्यामुळेच मी ही अल्ट्रा मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण करू शकलो असे अग्रवाल यांनी सांगितले.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172