Advertisment
बाल विश्व

अवैध गर्भलिंग निदान; डॉ.गवारे चा मुख्य साथीदार संदीप गोरे मशीन विक्री करतानां अटक

जालना-सन 2022 मध्ये अवैध गर्भलिंग निदान करणार मोठं रॅकेट उघडकीस आलं होतं आणि या रॅकेटचा मोरक्या होता डॉ. सतीश गवारे. या डॉक्टरचाच आणखी एक महत्त्वाचा साथीदार होता तो म्हणजे संदीप कैलास गोरे ,वय 23 वर्षे राहणार भेलपुरी जिल्हा जालना. सध्या महको कंपनीच्या फार्म हाऊस राजुर रोडवर तो राहतो. त्याने त्याचा मित्र सोमनाथ परसराम बारसे वय तीस वर्षे राहणार हनुमान नगर कमलापूर तालुका गंगापूर आणि योगेश शालिकराव धांडे वय 22 वर्षे राहणार चाळगे नगर इंदेवाडी जालना या दोघांच्या मदतीने गर्भलिंग निदान करणारी एक सोनोग्राफी मशीन अवैधपणे विकताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस आणि आरोग्य विभागाच्या पथकाने सापळा रचून पकडली आहे. त्यामुळे डॉक्टर गवारे जरी मुख्य आरोपी असला तरी त्याचे साथीदार मात्र अजून हे रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button