मृत झालेल्या कर्मचाऱ्याला आणि सेवानिवृत्त महिलेला प्रशिक्षणाला हजर राहण्याचे आदेश; “आंधळं दळतय, कुत्र पीठ खातय,” आरोग्य विभागाचा कार्यक्रम

जालना- जसा जसा मार्च महिना जवळ येईल तशी तशी सरकारी कार्यालयांना वेगवेगळ्या प्रशिक्षणाची आणि विकास कामे आटोपण्याची घाई झालेली असते. तशीच एक घाई सध्या जालना जिल्हा परिषदेतील जिल्हा आरोग्य विभाग आणि सामान्य रुग्णालयाला झालेली आहे. एक दिवसीय एकात्मिक सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत (IDSP)संसर्गजन्य आजारा संदर्भात प्रशिक्षण देण्यासाठी जालना जिल्ह्यातील 48 प्रयोगशाळा तंत्रज्ञांना गुरुवार दिनांक 19 रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती जयश्री भुसारे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजेंद्र पाटील यांनी कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे संयुक्त आदेश काढले. कोणतीही खातरजमा न करता कर्मचारी आहेत किंवा नाहीत याची देखील तपासणी करण्याची गरज या अधिकाऱ्यांना वाटली नाही .खरंतर या प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी ही जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची असते त्यामुळे भरमसाठ यंत्रणा हाताखाली असताना मृत आणि सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आलीच कशी? हाअजब प्रकार Edtv News(www.edtvjalna.com) उघडकीस आणला आहे या नावाने बद्दल प्रशिक्षण देणाऱ्या अधिकाऱ्यांना देखील माहिती नव्हती.
48 कर्मचाऱ्यांच्या या प्रशिक्षणाला केवळ 33 कर्मचारी उपस्थित होते. उर्वरित कर्मचाऱ्यांची माहिती घेतली असता आदेशामधील अनुक्रमांक 38 नुसार भोकरदन येथील संजय गडकर यांचे नाव आहे हे प्रयोगशाळा तंत्रज्ञ भोकरदन वरून दोन वर्षांपूर्वीच सिल्लोडला गेले आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. दोन वर्षानंतर आजही ते जालना जिल्ह्याच्या आरोग्य विभागात कार्यरत असल्याचे या आदेशावरून स्पष्ट होत आहे . दोन वर्ष आरोग्य विभागाने काय केले? हे नावे आलेच कसे? दोन वर्षात आरोग्य विभागाने या कर्मचाऱ्यांशी संपर्कच केला नाही का?मृत व्यक्तीला प्रशिक्षण द्यायचं कुठे आणि कसं असे अनेक संताप जनक प्रश्न उपस्थित होत आहेत. दुसऱ्या प्रकरणात परतुर प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्रीमती शांता सोनवणे या दोन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाल्या आहेत त्यांना देखील या प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. त्यांच्यापर्यंत हे आदेश जाणार कसे? आणि गेले त्यांनी प्रशिक्षणाला काय यावं? .बदनापूर येथील शेख कलीम यांची चार महिन्यांपूर्वीच वैद्यकीय शिक्षण मंडळात पदोन्नती होऊन ते रवाना झाले आहेत. परंतु आज या आदेशान्वये त्यांना प्रशिक्षणाला उपस्थित राहण्याचे सांगण्यात आले आहे. ग्रामीण रुग्णालय नेर येथील दिलीप मोहिते यांची चार महिन्यांपूर्वीच जालना येथे टीबी विभागात बदली झाली आहे. त्यांचे देखील नाव या यादीत आहे. यादीतील 15 नंबरचे जिल्हा सामान्य रुग्णालयातील सूर्यवंशी हे व्यक्तिमत्व कोणतं आहे? आणि कुठे आहे?कसं आहे? हेच या कर्मचाऱ्यांनी कधी पाहिलं नाही.त्यामुळे 48 पैकी 33 कर्मचाऱ्यांनी हे प्रशिक्षण घेतलं असलं तरी या प्रयोगशाळा तंत्रज्ञांच्या ठिकाणी अनेक ठिकाणाहून बदलून कर्मचारी पाठवले आहेत त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा किती सक्षम आहे हे यावरील प्रकारावरून लक्षात येते.
ज्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून या प्रकाराची माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस प्रत्येक जण ही यादी मी नाही काढली, एवढेच सांगत होता यादी कोणीही काढू परंतु आरोग्य विभागात नेहमीप्रमाणेच “आंधळं दळतय आणि कुत्र पीठ खातय” अशी परिस्थिती आजही सुरू आहे.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172