जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; प्रा.डॉ.रफिक शेख यांची वर्ल्ड कप खो-खो स्पर्धेसाठी पंच म्हणून निवड

जालना- दिल्ली येथे दिनांक 13 ते 19 जानेवारी 2025 दरम्यान जागतिक खो-खो स्पर्धा होणार आहेत. जगातील 25 देश या स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत. या स्पर्धेचा पंच म्हणून प्रा. डॉ. रफिक शेख यांची निवड झाली आहे. अंबड तालुक्यातील अंकुश नगर येथे मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहे या विद्यालयात डॉ. रफिक शेख क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
महाराष्ट्रातून फक्त चार पंच निवडल्या गेल्या आहेत त्यामध्ये डॉ रफिक यांचा क्रमांक आहे त्यामुळे जालना जिल्ह्याची मान उंचावणारच आहे डॉ रफिक यांनी यापूर्वी देखील अनेक ठिकाणी प्रशिक्षक व पंच म्हणून काम केलेले आहे आणि विविध पुरस्कारही पटकावले आहेत त्यांच्या या उत्तुंग भरारीची सविस्तर माहिती www.edtvjalna.com घेणारी ही घेतलेली मुलाखत.(डॉ. प्रा रफिक शेख यांना शुभेच्छा देण्यासाठी 7720849764 हा भ्रमणध्वनी क्रमांक.
सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172