Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

सख्ख्या मुलानेच केला आईवर रात्रभर लैंगिक अत्याचार; न्यायालयाने ठोठवली जन्मठेपेची शिक्षा

जालना- पोटच्या मुलानेच आईवर रात्रभर लैंगिक अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणारी संताप जनक घटना दिनांक एक मे 2023 रोजी जालना तालुक्यातील पारेगाव येथे घडली होती. या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने आज जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. दुसरे जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी ही शिक्षा सुनावली आहे. जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिने साधा करावास अशी ही शिक्षा आहे.

जालना तालुक्यातील पारेगाव येथे राहुल गौतम गायकवाड वय 27 हा आपल्या आईसह राहत होता. दिनांक एक मे रोजी रात्री आठ वाजेनंतर दोन्ही मायलेकरं अंगणामध्ये झोपी गेले. थोड्याच वेळात राहुल गायकवाड यांनी घरात जाऊन लाईट बंद केले आणि मोबाईलची बॅटरी सुरू केली. मोबाईलच्या प्रकाशात काहीतरी चावले आहे असे म्हणत त्याने त्याच्या आईला आवाज दिला आई धावतच घरामध्ये आली आणि काय चावले आहे असे विचारतात त्याने मांडी जवळ काहीतरी चावल्याचे सांगितले .आई मांडी जवळ पाहत असतानाच त्याने आईला जवळ ओढून घेतले आणि तोंड दाबले.  ओरडली तर जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. दुसऱ्या दिवशी दिनांक 2 मे पहाटे चार वाजेपर्यंत राहुल गौतमने सख्या आईवर चार वेळा लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील पिडीतेने स्वतः मौजपुरी पोलीस ठाण्यात जाऊन आप बीती सांगितली आणि गुन्हा नोंद केला. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना न्यायालयात एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये पीडिता,तसेच वैद्यकीय अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक कदम यांची साक्ष महत्त्वाची ठरली. सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील बाबासाहेब इंगळे यांनी काम पाहिले.

सविस्तर बातम्यांसाठी डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button