पाव किलो वजनात वांग्याची फोड आणि तुरीपेक्षा मोठं मिरचीचे झाड दिसलं तर नवल वाटू देऊ नका!

जालना- दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलत आहे . प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळे संशोधन होत आहे. असेच संशोधन बियाण्याची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालन्यात देखील सुरू असतं . याचा नमुना म्हणून सध्या कलश सीड्स च्या वतीने पीक प्रात्यक्षिक पाहणी कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.
फळभाजी, पालेभाजी या प्रकारात वेगवेगळे वाण संशोधनावर कलश सीड्स मध्ये प्रयोग सुरू असतात. या प्रदर्शनात शेतकरी, नागरिक आणि परदेशातील पाहुणे शेतकरी देखील भेट देऊन या संशोधनाविषयी माहिती घेत आहेत. आपण नेहमीच बाजारात जातो आणि पाव किलो वांगे मागतो त्यावेळी छोट्या छोट्या आकाराचे पाच-सात वांगे त्याच्यात येतात. परंतु भविष्यात जर आपण पाव किलो वांगे मागितले आणि भाजीवाल्याने कोबी, डांगर ,काशीफळ या भाज्यांप्रमाणेच वांग्याला कापून पाव किलो ची फोड दिली तर नवल वाट देऊ नका! कारण आता अर्धा किलो पाऊण किलोचे एक- एक वांग या नवीन संशोधनात पुढे आले आहे. एवढेच नव्हे तर तुरीच्या झाडापेक्षाही मिरचीचा मोठा झाड पाहायला मिळत आहे , भविष्यात जर एखादा शेतकरी काही संकट आलं आणि मी मिरचीच्या शेतात लपलो होतो असं म्हटलं तर नवल वाटायला नको! भेंडी आणि कोबी मध्ये अनेक ठिकाणी भाजी तयार करताना वेगवेगळे रंग टाकले जातात परंतु आता ही भाजीच वेगवेगळ्या रंगात यायला लागली आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नवीन संशोधन इथे पाहायला मिळतात . खरंतर या सर्व संशोधनाचे बियाणं जालन्यात तयार होतं. परंतु केवळ जालना आणि मराठवाड्यात या संशोधनातील दहा ते पंधरा टक्केच प्रकार माहित आहेत .उर्वरित प्रकार हे इतर राज्यात आणि परदेशात बियाण्यांच्या माध्यमातून पाठवले जातात .या सर्व प्रकाराविषयी माहिती दिली आहे कलश सिड्स चे कार्यकारी संचालक समीर अग्रवाल यांनी.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172