भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्राची सांगड घालणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे जालन्यात आयोजन

जालना- समृद्ध वारसा असलेल्या भारतीय ज्ञान प्रणाली आणि भौतिकशास्त्र यांची एकत्रित सांगड घालणारा “बौद्धिक सुसंवाद” या विषयावर जालन्यात दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील जे.इ.एस. महाविद्यालयामध्ये दिनांक 10 आणि 11 जानेवारी दरम्यान ही परिषद होणार आहे.या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अनुषंगाने महाराष्ट्रात प्रथमच “भौतिक विज्ञान आणि भारतीय ज्ञान परंपरा” या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्याची संधी आणि मागील 55 वर्षांची उज्वल परंपरा असणाऱ्या जे. इ. एस. महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विभागाला मिळाले आहे. त्या अनुषंगाने या परिषदेची रूपरेषा आणि मान्यवरांची उपस्थिती याविषयी या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेश अग्निहोत्री यांनी सविस्तर माहिती दिली आहे. (सविस्तर माहितीसाठी कृपया खालील व्हिडिओ पहा, दूरध्वनी-02482 232880,242301)
दरम्यान या परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त संशोधक अभ्यासकांची व्याख्याने ऐकण्याची संधी, तसेच निमित्ताने शंभर पेक्षा जास्त संशोधक आपल्या शोधनिबंधाचे सादरीकरण करणार आहेत. भारतीय ज्ञान प्रणालीवर आधारित पुस्तक प्रदर्शनी येथे पाहायला उपलब्ध होणार आहे. ही परिषद सर्वांसाठी खुली आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप महिको रिसर्च फाउंडेशनचे मुख्य संशोधक डॉ. भारत चार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. परिषदेच्या तयारीसाठी संयोजन समिती सचिव डॉ. सुशांत देशमुख,डॉ. अरुणा म्हारोळकर, प्रा.करणं सातुरे, डॉ. सुनील इंदुरकर, योगेश लहाने हे परिश्रम घेत आहेत.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172