करोडपतींच्या वस्तीत कुंटणखाना; तीन आंबट-शौकिनांसह चार महिला ताब्यात

जालना- जालना अंबड महामार्गावर उच्चभ्रू समजली जाणारी यशवंत नगर ही कॉलनी आहे .अगदी महामार्गालाच खेटून असल्यामुळे या कॉलनीमध्ये लोकप्रतिनिधी ,प्राध्यापक, शासकीय कर्मचारी, पोलीस, अशा सर्वच उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या रहिवाशांची घरे आहेत. याच वस्तीमध्ये रस्त्याच्या बाजूला असलेल्या “अक्षय या घरामध्ये कुंटणखाना सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या अनुषंगाने मंगळवार दिनांक सात रोजी पोलिसांनी बनावट ग्राहक तयार करून या घरावर छापा मारला.त्या वेळी हा व्यवसाय चालवणारी एक महिला तीन पीडित महिला आणि तीन ग्राहकांना रंगे हात पकडले आहे.
जालन्यातीलच सतकर नगर भागात राहणारी श्रीमती पवार वय 40 वर्षे, ही महिला इतर पीडित महिलांना हाताशी धरून वेश्या व्यवसाय चालवत होती. पोलिसांनी छापा मारला त्यावेळेस तीन पिडीत महिला आणि त्यांच्यासोबत सचिन सुभाष जाधव वय 34 राहणार नूतन वसाहत जालना, बाबुलाल खिमाराम चौधरी वय 25, राहणार बालोतरा राजस्थान, हल्ली मुक्काम शहागंज छत्रपती संभाजी नगर आणि सचिन अंकुश खोमणे वय 24 वर्षे राहणार मच्छिंद्र चिंचोली तालुका घनसावंगी यांना पकडले.
स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका जालना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे, रामप्रसाद पोहरे, रमेश राठोड, देविदास बोकन,प्रभाकर वाघ, फुलचंद गव्हाणे ,कैलास खारडे ,कविता काकस, सत्यभामा काकडे, आदी कर्मचाऱ्यांनी हा छापा मारला.
अधिक माहिती साठी वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172