महाराष्ट्रात दिसणारा हैदोस हाअंगठेछाप मुळे नाही तर संस्कारांच्या अभावामुळे- आचार्य हरिभाऊ वेरुळकर; 28 व्या महाचिंतनी शिबिराला आजपासून प्रारंभ

जालना- आजच्या परिस्थितीमध्ये शिक्षणाचे प्राबल्य असले तरी संस्काराचा अभाव आहे .गुंडगिरी करणारे अशिक्षित नाहीत ते सुशिक्षितच आहेत परंतु संस्कारहीन असल्यामुळे, त्यांच्यावर संस्काराचे प्राबल्य नसल्यामुळे आज ही परिस्थिती ओढवली आहे. अजमल कसाब हा काही अंगठे बहाद्दर नव्हता .तो सुशिक्षित होता परंतु त्याच्यावर संस्कार नव्हते .म्हणून ती परिस्थिती ओढवली होती. असे मत 28 व्या महाचिंतनी शिबिराचे उद्घाटक मोझरी येथील आचार्य हरिभाऊ वेरुळकर यांनी व्यक्त केलं. दिनांक 9, 10 आणि 11 असे तीन दिवसीय हे महाचिंतनी शिबिर ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूत वाडी,जालना येथे आज पासून सुरू झाले आहे. पहाटे 7:00 वाजेच्या सुमारास श्रीकृष्ण मूर्तीला मंगल स्नान घालून गीता पाठ घेण्यात आला आणि कडूभाऊ काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी या शिबिराचे स्वागताध्यक्ष आ.अर्जुनराव खोतकर, सुदाम शास्त्री ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज बंडगर सांगोला, या कार्यक्रमाचे संयोजक डॉ. बळीराम बागल आदींची उपस्थिती होती. खालील व्हिडिओ पहा.
तीन दिवस चालणाऱ्या या निवासी शिबिरामध्ये आज पहिल्या सत्रातील दुसरे वक्ते ह. भ .प .ज्ञानेश्वर महाराज बंडगर, यांनी “मराठी संस्कृतीमधील मूल्य विचार” यावर प्रकाश टाकला. उद्या दिनांक 10 रोजी सकाळी 9 ते 11 डॉ. भदंत हर्ष बोधी महाथेरो छत्रपती संभाजीनगर यांचे “जागतिक समस्या व त्यावरील उपाय” या विषयावर तसेच योगेश खंदारे परभणी यांचे “अपंगाचे अभंगत्व “या वर चर्चासत्र होणार आहे. पाचव्या सत्रात दुपारी तीन ते पाच दरम्यान “माझे गाव, आदर्श गाव” या विषयावर भास्कर पेरे पाटील आदर्श सरपंच पाटोदा छत्रपती संभाजीनगर ,आणि “जालन्याचे सर्वज्ञ” या विषयावर म. श्री. चिरडे बाबा निफाड ,यांचे चर्चासत्र पार पडणार आहे. रात्री सहाव्या सत्रात आठ ते दहा वाजे दरम्यान ह.भ.प. जलील महाराज सय्यद मुंबई यांचे संगीत प्रवचन होणार आहे.
दिवस तिसरा शनिवार दिनांक 11, मराठी साहित्याचे अभ्यासक पुणे येथील ह .भ. प. डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार आहे. यासाठी पुरस्कारार्थी आहेत नागपूर येथील संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.कोमल ठाकरे.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172