दादा पद द्या! नाहीतर…..

जालना- सध्या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आहे. शिंदे सेना भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी गट असे तिघे मिळून एकत्र आहेत. परंतु जालना जिल्ह्यामध्ये मात्र शिवसेना आणि भाजप यांचीच युती दिसत आहे. अजित पवार गटाला कुठलेच पद नसल्यामुळे महायुतीमध्ये त्यांचा वाटा नसल्याचे सध्यातरी चित्र जाणवत आहे. त्यामुळे निवडून आलेल्या सर्वच आमदारांनी माजी आमदार तथा अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांना आमदारकी मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. .व्यासपीठावरून देखील अशा प्रकारच्या उघड मागण्या ते करीत आहेत. याविषयी अरविंदराव चव्हाण यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172