Advertisment
Jalna Districtजालना जिल्हाराज्य

घेवर फेणी; जिभेचे चोचले पुरविण्यासोबतच जावयाची पहिली संक्रांत गोड करणारं मिष्टान्न

जालना- जालना शहर हे सर्वच बाबतीत चर्चेचं शहर आहे .राजकारण ,समाजकारण, उद्योग, बी- बियाणे, वेगवेगळ्या योजना ,अतिक्रमण ,वेगवेगळे भ्रष्टाचार, अशा अनेक बाबींनी जालना शहर नेहमीच चर्चेत असते. ह्या सर्व बाबींसोबतच आणखी एका विषयाने जालना शहर चर्चेत असते ते म्हणजे नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच संक्रातीच्या तोंडावर इथे जिभेचे चोचले पुरवणारा आणि नववधूंची,जावयाची संक्रांत गोड करणाऱ्या घेवरमुळे.  हे “घेवर” फक्त डिसेंबर जानेवारी मध्येच मिळतं आणि तेही जालन्यात. मुख्य रस्त्यावर दुकान थाटून सर्वांसमोर हे मिष्टान्न तयार केल्या जाते.परंतु याच्या जोडीला आणखी एक व्यवसाय उभारी घेतो तो म्हणजे फेणी. या फेणी मात्र हैदराबाद आणि राजस्थान येथून खरेदी केल्या जातात आणि या घेवर सोबत त्या विकल्या जातात. काळानुरूप या घेवर मध्ये देखील बदल झाला आहे. पूर्वी फक्त डालडा आणि तेलातच हे घेवर तयार होत होतं परंतु आता ग्राहकांच्या मागणीनुसार हे शुद्ध तुपात देखील तयार व्हायला आहे आणि त्याला आकर्षक काजू बदाम आणि गुलाबांच्या पाकळ्याने सजवलं जात आहे. या घेवरचे एक विशिष्ट वैशिष्ट्य म्हणजे हे बाराही महिने क्वचित मिळतं .परंतु संक्रांतीच्या निमित्याने याचं मोठं महत्त्व आहे. महिनाभरासाठी थाटलेल्या या दुकानांमधून लाखो रुपयांची उलाढाल जालन्यात केल्या जाते .एक दुकान चालवण्यासाठी चार ते पाच जणांचे मनुष्यबळ लागतं.  म्हणजेच एक महिना चालणारा हा व्यवसाय वर्षभरासाठी उत्पन्न देऊन जातो.

घेवर हा पदार्थ अद्याप पर्यंत घरी करण्याचा पदार्थ झाला नाही. कारण त्याला जी प्रक्रिया आहे ती थोडी किचकट आहे आणि घरी करण्यासाठी ती परवडत नाही.  घरी करण्याचा प्रयत्न केला तर ते तयार होईलच असेही नाही .त्यामुळे ज्यांना जिभेचे चोचले पुरवायचे आहेत त्यांनी सरळ बडी सडक वर जाणे आणि पाहिजे तेवढे घेवर फेणी खरेदी करून येथेच ताव मारणे.

अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button