आंतरराष्ट्रीय परिषद ;जगात फक्त भारताचाच इतिहास आहे!का? संशोधक,लेखक प्रा.निलेश ओक यांनी सांगितली ही कारणे

जालना- जगामध्ये फक्त भारताचाच विषय इतिहास लिहिला गेला आहे. त्याची काय कारणे आहेत यासह इतरही भारतीय परंपरा आणि भौतिकशास्त्र यांची कशी सांगड घातली गेली आहे. याविषयीची मांडणी केली आहे प्रसिद्ध लेखक, संशोधक वक्ता सहयोगी प्राध्यापक निलेश ओक यांनी. त्यांच्या म्हणण्यानुसार ऋग्वेद हे रामायण आणि महाभारतापूर्वीच अस्तित्वात होते .कारण साडेसात हजार वर्षांपूर्वी लिहिलेल्या महाभारतात आणि त्याही पूर्वी साधारण 15हजार वर्षांपूर्वी लिहिलेला रामायणामध्ये ऋग्वेदाचा संदर्भ आहे. याचा अर्थ ऋग्वेद हे जवळपास 25 हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होते असा दावाही त्यांनी केला आहे.( सविस्तर बातमी पहा खालील व्हिडिओमध्ये)
येथील JES महाविद्यालयात “भारतीय ज्ञान परंपरेच्या समृद्ध वारशासह भौतिक शास्त्राचा समावेश” या विषयावर भौतिकशास्त्र विभागाने नुकतीच एक दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती यावेळी प्रा.निलेश ओक हे बोलत होते.
या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनाला जालना एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भाकड, प्राचार्य डॉ. गणेश अग्निहोत्री, यांच्यासह संयोजक सहाय्यक प्राध्यापक डॉ. अरुणा मारोळकर, सहाय्यक प्राध्यापक के. आर. सातुरे, आयोजन सचिव डॉ. प्रा. एस. बी. देशमुख ,डॉ. एस. जे. इंदूरकर ,वाय. के.लहामटे यांच्यासह राज्यभरातून विविध महाविद्यालयाच्या आलेल्या भौतिकशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांची आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या डॉ. व्ही.जी. देवणीकर, डॉ.डी.जी.कुबेरकर,डॉ. अरुण पाठक,डॉ. श्रेयस कुरेकर ,महाराष्ट्र शासनाच्या गॅझेटीयर विभागाचे संयुक्त संपादक दिलीप बलसेकर, जे. इ. एस. महाविद्यालयाचे भौतिकशास्त्र विभागाचे माजी प्राध्यापक डॉ. एल. एम. कुर्तडीकर ,डॉ.एस. के. पोपळघट आदींनी या परिषदेमध्ये आपले विचार मांडले.
अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172