Advertisment
Jalna Districtजालना जिल्हा

“रात्रीस खेळ चाले”, जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गच्चीवर, एक सापडला एक पळाला

जालना- जालना शहरातील गांधी चमन परिसरात राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचे जिल्हा स्त्री रुग्णालय आहे. या रुग्णालयाच्या छतावर जाण्यासाठी खुलेआम परवानगी आहे. कारण इथे दारच नसल्यामुळे “आओ जाओ घर तुम्हारा” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गच्चीवर माणसांची  विष्ठा, दारूच्या बॉटल, पुरुषांचे कपडे असं सर्व काही पाहायला मिळतं . या प्रकारामुळे आर्थिक नुकसान होत नाही, त्यामुळे फारसे कोणी लक्ष देत नाही. परंतु सुरक्षारक्षकाच्या सावधगिरीमुळे गच्चीवर” रात्रीस चालणारा  खेळ  उजेडात आला  आहे.

त्याचे झाले असे की, येथील सुरक्षारक्षक अनंता राजाराम खारडे हे कर्तव्य बजावत असताना काल दिनांक 14 रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास गच्चीवर पाहणी करण्यासाठी गेले असता तेथून दोन इसम पळून जाताना दिसले. याचवेळी प्रसंगावधान राखत अनंता खार्डे यांनी मुख्य प्रवेशद्वारावर असलेल्या विष्णू कायंदे यांना भ्रमणध्वनीवरून प्रवेशद्वार बंद करायला सांगितले. त्यामुळे पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या दोन तरुणांपैकी एका तरुणाला पकडण्यात या कर्मचाऱ्यांना यश आलं आणि कदीम जालना पोलीस बोलावून त्यांच्या हवाली केले .दरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या आरोपीमध्ये अर्जुन किशोर मिसाळ वय 18, राहणार रहमानगंज छाइपुरा जालना, तर पळून जाण्यात यशस्वी झालेला अर्जुनचा साथीदार ओम विठ्ठल पवार राहणार, माळीपुरा याचे नाव आहे. हे दोघेही छतावर असलेल्या सोलार वॉटर हीटर साठी वापरल्या जाणाऱ्या तांब्याच्या धातूच्या नळ्या तोडत होते. सुमारे पाच फूट लांबीची एक नळी असते. ही नळी जशास तशी चोरून नेणे कठीण असल्यामुळे या नळ्यांचे बारीक बारीक तुकडे करून तो चोरून नेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. यापूर्वी देखील याच ठिकाणी अशा प्रकारचे सोलार हिटर तोडून त्यामधील धातूच्या नळ्या चोरून नेल्याचे स्पष्ट दिसत आहे. बाजारामध्ये या तांब्याच्या मोडला सुमारे सातशे रुपये किलो अशी चांगल्या किमतीची मागणी आहे. कारण या नळात शुद्ध तांब्याच्या धातूपासून तयार केल्या जातात. प्राथमिक अंदाजानुसार आत्तापर्यंत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज जिल्हा स्त्री रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. झेड. गवारे यांनी व्यक्त केला आहे.

अधिक माहिती वाचा …
डाऊनलोड करा edtvjalna हे ॲप, किंवा आमच्या www.edtvjalna.com या वेबसाईटला भेट द्या. फक्त व्हिडिओ पाहण्यासाठी edtvjalna या youtube वर जा.या बातम्या आपण फेसबुक,इन्स्टाग्राम,व्हाट्सएप चॅनलवर देखील पाहू शकता.
-दिलीप पोहनेरकर-9422219172

दिलीप पोहनेरकर 9422219172,https://play.google.com/store/apps/details?id=com.jalna.edtv ,www.edtvjalna.com

Related Articles

Back to top button